उत्तर महाराष्ट्र

सहजीवनाची सुरवात केली रक्तदानाने ! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः ग्रामीण भागातील जनता अजूनही मागास विचारांची, असे मानले जाते. मात्र, हेच लोक आपल्या कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण करतात, तेव्हा त्यांचे कौतुक न झाले तरच नवल..! जामनेर तालुक्‍यातील पहूर येथील शेतकरी तरुणाचा गावातीलच मुलीशी विवाह जुळला. सोहळ्यात खर्च नको म्हणून त्यांनी दोनशे रुपयांत लग्न लावून घेतले. एवढ्यावरच हे दांपत्य थांबले नाही तर, सहजीवनाचा प्रारंभ विधायक कार्यानं व्हावा म्हणून दोघांनी विवाहानंतर लगेचच रक्तदान करत अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला. 

अतुल लहासे हे पहूर येथील रहिवासी, व्यवसायाने शेतकरी. काही दिवसापूर्वी पहूरमधील वर्षा यांच्याशी त्यांचे लग्न जुळले. विवाह म्हटला की मोठा खर्च, पैशांची उधळपट्टी. परंतु, असे न करता अतुल व वर्षा यांनी आदर्श विवाह करण्याचे ठरवले. ही गोष्ट दोघांच्या कुटुंबातील सदस्यांना सांगून केवळ 200 रुपयांत ते विवाहबद्ध झाले. या नव्या सहजीवनाची सुरवात नव्या संकल्पनेने करावी, त्यातून कुणाला तरी जीवदान मिळावे हा विचार करत या दांपत्याने आज थेट जळगावी येत इंडियन रेडक्रॉस सोसायटी गाठली. तेथे दोघांनीही रक्तदान केले आणि आपल्या पुढील जीवनास सुरवात केली. 

रेडक्रॉस सोसायटीतर्फे सत्कार 
नवदांपत्याच्या या अभिनव विवाहासोबतच आदर्श वैवाहिक जीवनाच्या सुरवातीबद्दल अतुल व वर्षा लहासे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र, ट्रॉफी, विमा संस्थेचे उपाध्यक्ष गनी मेमन यांच्याहस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अरविंद देशमुख, रेडक्रॉसचे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, डॉ. अनिल चौधरी, जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा उपस्थित होत्या. तसेच जिल्हाधिकारी यांनी देखील नवदांपत्याचा कौतुक करून अभिनंदन केले. 

रक्तदान जागृतीचा संकल्प 
नवदाम्पत्य अतुल व वर्षा लहासे यांनी रक्तदान करून वैवाहिक जीवनाला आज सुरवात केली. यासोबत त्यांनी आजूबाजूच्या तसेच कुटुंबातील सदस्यांना रक्तदानाचे महत्त्व सांगून रक्तदानाबाबत जनजागृती करणार असल्याचाही संकल्प केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT