उत्तर महाराष्ट्र

वाळू बंदचा तिढा : निम्म्या महाराष्ट्रात बांधकामासाठी "क्रश सॅण्ड'चा वापर 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : वाळूला पर्याय म्हणून "क्रश सॅण्ड'चा जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात सर्रास वापर होत असून, योग्य प्रक्रियेतून केलेले "क्रश सॅण्ड'चे उत्पादन बांधकामासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्याय असल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाने जळगावसह खानदेश, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात वाळूचाच सर्रास वापर होत असल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे दिसून येते. वाळूचा वापर कायमस्वरूपी बंद करणेच पर्यावरण संवर्धनासह कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य असल्याचे स्थापत्य अभियंत्यांकडून सांगितले जात आहे. 
गेल्या चार-पाच महिन्यांपासून वाळूगटांच्या लिलावाचा तिढा सुटलेला नसल्याने जळगावसह खानदेशात व राज्यातही वाळू उत्खनन बंद आहे. गेल्याच आठवड्यात शासनाने वाळू वगळून गौण खनिज उत्खननाचे धोरण जाहीर केले. परंतु, सर्वाधिक महसूल देणाऱ्या वाळूचा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. खानदेशातील बांधकामे पूर्णत: वाळूवर अवलंबून असल्याने वाळूच बंद असल्यामुळे बांधकाम क्षेत्रावर अवकळा आली आहे. हीच स्थिती कायम राहिली तर संपूर्ण बांधकाम क्षेत्र आणि त्यावर उदरनिर्वाह असणाऱ्या कामगार, मजूर वर्गावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे वाळूला पर्यायी घटकावर चर्चा सुरू झाली आहे. 

"क्रश सॅण्ड'चा वापर 
खानदेश, विदर्भ वगळता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरात तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातही "क्रश सॅण्ड'चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. किंबहुना, त्याठिकाणी वाळू वापरणे जवळपास बंदच झाले आहे. त्यामुळे खानदेशातही ते होणे गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे "क्रश सॅण्ड' हा उत्पादित घटक आहे, त्यावर 5 टक्के जीएसटी लागतो. सर्व व्यवहार कायदेशीर होतात. वाळू उपसा व वाहतुकीतील अनियमितता, चोरी हे प्रकार "क्रश सॅण्ड'च्या वापराने टळू शकतील. 

"स्टोन डस्ट' धोकादायक 
दुसरीकडे काही ठिकाणी "स्टोन डस्ट'चाही वापर केला जातो. मात्र, कोणत्याही प्रकारच्या बांधकामासाठी "स्टोन डस्ट' ही तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे ते वापरणे धोकादायक आहे, असेही सांगितले जाते. 
 
 
महाराष्ट्रात आता बहुतांश ठिकाणी "क्रश सॅण्ड'चा वापर केला जात आहे. वाळूला पर्याय म्हणून हा घटक तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने वाळू बंद होणे गरजेचे आहे. "क्रश सॅण्ड'च्या वापरास प्रोत्साहन मिळाले पाहिजे, त्यासाठी व्यक्तिश: व इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे आपले सहकार्य राहील. 
- मिलिंद राठी (स्ट्रक्‍चरल इंजिनिअर) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT