shahu hospital
shahu hospital 
उत्तर महाराष्ट्र

शाहू रुग्णालय अधिग्रहित करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना विषाणूच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुग्णालय हे तातडीच्या उपाययोजनासाठी अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. 

कोरोना व्हायरस सर्वत्र पसरलेला असून जळगाव शहरात पहिला पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे. यामुळे सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. एक पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने आणखी रूग्ण असल्याचा संशय बळावला आहे. यामुळे कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिकेचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज रूग्णालय अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे रुग्णालय अधिग्रहित राहणार आहे. त्याबाबत प्रांताधिकारी, जिल्हा रुग्णालय, पोलीस यंत्रणा यांना तसे आदेश दिले. 

जिल्ह्यात सर्व कारखाने लॉकडाऊन करण्याचे आदेश आहेत. यात सर्व दुकाने, कारखाने बंदचे आदेश आहेत. असे असले तरी गरज लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात जीवनावश्‍यक, अत्यावश्‍यक वस्तू, सेवा संबंधित उद्योग, कारखाने, कंपन्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काल दिले होते. अत्यावश्‍यक, जीवनावश्‍यक वस्तू, कारखाने सुरू करण्याबाबत संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापनांना कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आदेश देण्यात आले आहे. ते कारखाने सुरू करण्यासाठी संबंधितांना परवानगी देण्यासाठी सहा जणांची समिती गठित करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT