उत्तर महाराष्ट्र

जिल्ह्यात आता ओल्या दुष्काळाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस होत असून, सप्टेंबर महिन्यातही मुक्काम वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ओल्या दुष्काळाची शक्‍यता व्यक्त होत आहे. सप्टेंबर पूर्ण झालेला नसताना जिल्ह्यात पावसाच्या सरासरीने 110 टक्‍क्‍यांचा आकडा गाठला आहे. 
वरुणराजाने यंदा जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावरच कृपा केली आहे. मराठवाडा वगळता सर्वत्र चांगला पाऊस होत असून, सप्टेंबर महिना संपत आल्यानंतरही पावसाचा मुक्काम कायम आहे. जळगाव जिल्ह्यात तर आतापर्यंत पावसाच्या सरासरीने शंभरी केव्हाच गाठली असून, 110 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 
बुधवारी जिल्हाभरात हजेरी लावल्यानंतर शुक्रवारीही सकाळपासूनच जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. जामनेर तालुक्‍यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने वाघूर नदीला चांगले पाणी आले, त्यामुळे वाघूर धरणाचा साठाही शंभर टक्‍क्‍यांपर्यंत पोचण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाने चांगली हजेरी लावली. 

18 सप्टेंबरचा पाऊस 
तालुका------ पाऊस--- टक्के 
जळगाव ---- 5.8-----96.4 
जामनेर-------13.4----109.2 
एरंडोल------9.0------116.9 
धरणगाव------19.1----98.5 
भुसावळ -----3.6-----114 
यावल-------6.7-----119 
रावेर--------14.4---131.1 
मुक्ताईनगर---5.0----100.3 
बोदवड------14.7----110.9 
चाळीसगाव---31.1----87.3 
पाचोरा------14.7----104.7 
भडगाव-----33.8----100.3 
अमळनेर----10.3----106.1 
पारोळा-----28.9----108.7 
चोपडा------30.1---110.8 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT