उत्तर महाराष्ट्र

भोईटे- पाटील यांच्यात कोण ठरणार सरस? 

सकाळवृत्तसेवा

चुरशीच्या लढती अपेक्षित असलेल्या भागात प्रभाग क्रमांक आठ "ब'च्या लढतीकडे पाहिले जात आहे. सुरवातीपासूनच या प्रभागावर सुरेशदादा जैन गटाचे वर्चस्व राहिले असले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने बदललेल्या समीकरणांनी राजकीय वर्चस्वाची दिशाही बदलल्याचे दिसत आहे. जैनांच्या कट्टर समर्थक लता भोईटे यांनी भाजपत प्रवेश करून उमेदवारी केली असून, त्यांना सेनेच्या कल्पना पाटलांचे कडवे आव्हान आहे. राष्ट्रवादीच्या कोमल शिंदेही लढतीत कायम असल्याचा दावा केला जात आहे. 
 
प्रभाग आठ तसा मराठा समाजाचे वर्चस्व असलेला प्रभाग असला तरी मराठेतर मतदान जवळपास 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. हिराशिवा कॉलनी, कृषी विद्यापीठ परिसर, निमखेडी गाव, आहुजानगर, जुनी पाइप फॅक्‍टरी, दादावाडी, भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, प्रेमनगर असा हा भलामोठा प्रभाग. खोटेनगर परिसरातील मतदान इतर भागाच्या तुलनेत जास्त आहे. या प्रभागाने नेहमीच सुरेशदादा जैन यांच्या गटाला साथ दिली आहे. 

भोईटे- पाटील लढत 
भोईटे परिवार जैन यांचा कट्टर समर्थक. लताताई भोईटे यांनी नगराध्यक्षपदासह महिला बालकल्याण समितीचे सभापतिपदही भूषविले आहे. गेल्या दोन टर्म त्यांनी निवडणूक लढली नाही, त्यामुळे प्रभागात त्यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात आहे. अशात त्यांनी यावेळी भाजपत प्रवेश करून भाजपची उमेदवारी घेतली आहे. असे असले तरी भोईटे परिवाराला नावाने ओळखणारा वर्ग मोठा आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या उमेदवार कल्पना संतोष पाटील यांनी भोईटेंसमोर आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. संतोष पाटील स्वत: गेल्या पंचवार्षिकला राष्ट्रवादीचे उमेदवार होते. ते त्यावेळी पराभूत झाले असले तरी त्यांचा प्रभागाशी चांगला "कनेक्‍ट' आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी या भागात संपर्क कायम ठेवला आहे. त्यामुळे कल्पना पाटील चांगले आव्हान उभे करू शकतील, असा दावा केला जात आहे. 

अन्य उमेदवारांची साथ 
लता भोईटेंसमोर कल्पना पाटील किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवार कोमल नीलेश शिंदे व अपक्ष उमेदवार जयश्री बोरसे टिकणार नाही, असे सांगितले जात असले तरी बदलत्या राजकीय स्थितीने समीकरणे व संभाव्य परिणामही बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या प्रभागात "अ'मधून शिवसेनेचे मनोज चौधरी उमेदवार असून, त्यांचा या भागात चांगला प्रभाव असल्याचे चित्र सध्यातरी आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांनी या प्रभागात मोठी सभा घेतली, तर सुरेशदादांची प्रचारफेरी भव्य स्वरूपात निघाली. त्याचा लाभ सेनेच्या उमेदवारांना मिळू शकतो. भाजपकडून केवळ विधान परिषद सदस्य आमदार चंदुलाल पटेल यांची प्रचारफेरी निघाली. त्या प्रचारफेरीचा फारसा प्रभाव नव्हता. अर्थात, लता भोईटे यांना ओळखत नाही, अशी व्यक्ती प्रभागात नाही. दोन टर्म अलिप्त राहूनही भोईटे परिवार वर्चस्व कायम राखू शकते, असा दावा त्यांचे समर्थक करतात. काही महिलाही तशी कबुली देतात. "लताताईंनी फिरले नाही तरी चालेल..' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. असे असले तरी 30 जुलैस प्रचार संपण्याच्या वेळेपर्यंतचे एकूणच चित्र पाहता या प्रभागात प्रचंड चुरस आहे. या चुरशीच्या लढतीत लता भोईटे- कल्पना पाटील यांच्यात काट्याची लढत अपेक्षित आहे. त्यात नेमके कोण सरस ठरते, हे निकालाच्या दिवशीच समजेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT