उत्तर महाराष्ट्र

"जलयुक्त शिवार'च्या कामांना आचारसंहितेचा फटका बसणार 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षा प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान ही योजना राज्यात राबविली जाते. या योजनेत जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील अद्यापही 17 कामे जिल्हा परिषदेकडील बाकी आहेत. चौथ्या टप्प्यातीलही 1 हजार 86 कामे अद्याप अपूर्ण आहे. या मोहिमेचा आता पाचवा टप्पा सुरू होईल. तिसऱ्या टप्प्यातील कामांची अशी गत आहे. तर चौथ्या टप्प्याविषयी कामांना आचारसंहितेमुळे कात्री बसणार आहे. 
जलयुक्त शिवार अभियानात दरवर्षी दुष्काळग्रस्त तालुक्‍यातील गावांची निवड केली जाते. त्यात अभियानांतर्गत नाला खोलीकरण, नाला बंडिंग, सीएनसी बांध, गाळ काढणे, चर खोदणे, आदी कामे करून पावसाचे पाणी अडविण्याचे उपाय केले जातात. यामुळे पाऊस झाल्यानंतर त्यात पाणी जिरून त्या भागातील भूगर्भाची जलपातळी वाढण्यास मदत होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळ्याशिवाय इतर ऋतूतही पाणी राहील. त्यांना वर्षभरासाठी पिके घेता येतील. मात्र जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुखांना या कामांचे गांभीर्य लक्षात येत नसल्याचे दिसते. 2017-18 मध्ये 4 हजार 92 कामे करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यापैकी 4 हजार 80 कामे पूर्ण झाली. त्यावर 69 कोटी 35 लाखांचा खर्च झाला आहे. यातील जिल्हा परिषदेकडील बारा कामे बाकी आहेत. ही डिसेंबर 2018 ला पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मार्च उजाडला तरी ती पूर्ण न झाल्याने 31 मार्च अखेरची "डेडलाईन' देण्यात आली आहे. 
 
एक हजारांवर कामे अपूर्ण 
2018-19 मध्ये 4 हजार 426 कामे मंजूर असून त्यासाठी 101 कोटींचा आराखडा मंजूर आहे. 235 गावामध्ये ही कामे होणार होती. त्यापैकी 2 हजार 477 कामे सुरू झाली आहे. त्यावर आतापर्यंत 5 कोटी 51 लाखांचा खर्च झाला आहे. 1 हजार 391 कामे अद्याप पूर्ण होणे बाकी आहेत. या कामांना आचारसंहितेचा अडसर येणार असल्याने ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुरू होतील का? असा प्रश्‍न आहे. 
 
शेततळ्यांचे कामे 96 टक्के 
जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेत 2 हजार शेततळ्यांचे टार्गेट होते. त्यासाठी जिल्ह्यातून 4 हजार 547 शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केले. तीन हजार पाच शेततळ्यांना कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. 2 हजार 58 शेततळे पूर्ण झाली आहे. 1 हजार 978 शेततळे जिओ टॅगिंग यंत्रणेतर्फे टॅगिंग झालेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT