live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

मनपा तब्बल 21 वर्षानंतर जिल्हा बॅंकेच्या कर्जातून मुक्त 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्हा बॅंकेकडून महापालिकेने घेतलेल्या कर्जाचे "वनटाइम सेटलमेंट' (एकरकमी फेड) करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानुसार तब्बल 21 वर्षानंतर आज महापालिका जिल्हा बॅंकेच्या कर्जातून मुक्त झाली असून, बॅंकेला महापालिकेने 4 कोटी 69 लाख, 56 हजार 833 रुपयांची फेड करण्यात आली. त्यामुळे महापालिकेचे कर्जमुक्तीच्या दिशेने हे पहिले पाऊल मानले जात आहे. 

तत्कालीन जळगाव नगरपालिकेने 1197 ते 2001 या कालावधीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून विविध विकासकामे व शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करणे आणि हुडको कर्ज परतफेड, वाघूर पाणीपुरवठा योजनेसाठी 59 कोटी 34 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जापोटी महापालिकेकडून जिल्हा बॅंकेला 13 टक्के दराने दरमहा 1 कोटी भरणा नियमित सुरू होता. 
आतापर्यंत महापालिकेने घेतलेल्या कर्जापोटी जून 2019 पर्यंत मुद्दल 81 कोटी 35 लाख, 21 हजार 345 तर व्याज 113 कोटी 47 लाख, 54 हजार 658 रुपये असे एकूण 194 कोटी 82 लाख 76 हजार 3 रुपये कर्ज नियमित महापालिकेने भरले. त्यानुसार आज महापालिकेने "वनटाइम सेंटलमेंट' करून जिल्हा बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांच्याकडे पैसे देण्याचे पत्र देऊन "आरटीजीएस'च्या माध्यमातून पैसे वर्ग केले. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, गटनेते भगत बालाणी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा बॅंकेचे संचालक ऍड. रवींद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे आदी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. 

"वनटाइम'साठी सुरू होते प्रयत्न 
जिल्हा बॅंकेचे कर्ज "वनटाइम सेटलमेंट' करून कर्जक्तीसाठी आयुक्त डॉ. उदय टेकाळे, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी अभ्यास केला. तसेच जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी कर्जफेडीबाबत अनेकदा चर्चा करून कर्जाची माहिती घेऊन आज 4 कोटी 69 लाख 56 हजार 833 रुपये भरल्याने आज महापालिका जिल्हा बॅंकेच्या कर्जातून मुक्त झाले. 

"वनटाइम'मुळे 1 कोटी 3 लाखाची बचत 
महापालिकेने घेतलेल्या कर्जाच्या बॅंकेच्या वेळापत्रकानुसार डिसेंबरअखेरपर्यंत 5 कोटी 72 लाख 83 हजार 313 रुपये भरायचे होते. त्यानुसार महापालिकेने "वनटाइम सेटलमेंट'नुसार रक्कम भरल्याने 1 कोटी 3 लाख 6 लाख 480 रुपयांची बचत झाली आहे. तसेच कर्ज घेताना बॅंकेकडे महापालिकेचे 2 कोटी 81 लाखांचे शेअर लिंक असून ते आधी काढता येत नव्हते. हे शेअर काढण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करणार असून, येणाऱ्या पैशांचे लगेच फिक्‍स डिपॉझिट केले जाणार असल्याची विश्‍वसनीय माहिती समोर येत आहे. 

दोन मुदत ठेवी मोडून पैसे भरले 
महापालिकेने दोन बॅंकेत मुदत ठेवी ठेवल्या होत्या. या ठेवींवर 6. 55 टक्‍क्‍यांनुसार व्याज मिळत होते. तर दुसरीकडे जिल्हा बॅंकेच्या कर्जापोटी 13 टक्के दराने व्याज भरावे लागत होते. व्याजाचा फरक पाहता महापालिका 6.45 टक्के दराने जादा पैसे भरत असल्याचे आयुक्त, मुख्य लेखाधिकारी यांच्या लक्षात आले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने मुदत ठेवी मांडून जिल्हा बॅंकेला एकरकमी (वनटाइम) 4 कोटी 69 लाख 56 हजार 833 रुपये भरले. 

"हुडको'बाबत 200 कोटींचा प्रस्ताव 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत "हुडको'च्या अधिकाऱ्यांची दिल्ली बैठक झाली आहे. हुडको 200 कोटींपर्यंत एकरकमी फेडीबाबत सकारात्मक आहे. त्यानुसार लवकरच "हुडको'चा प्रश्‍नही मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. तर 200 कोटी रुपये भरण्यासाठी गाळ्यांचा थकबाकी भरण्यावर देखील महापालिकेकडून पावले उचलावी लागणार आहेत. 

जिल्हा बॅंकेच्या एकरकमी कर्जफेडीसाठी आयुक्त, लेखाधिकारी तसेच विशाल त्रिपाठी यांनी भरपूर मेहनत घेतली. याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी देखील चर्चा झाली होती. त्यानुसार आज महापालिका कर्जमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून, लवकरच "हुडको'चे कर्ज, तसेच गाळ्यांचा प्रश्‍न देखील मार्गी लागेल. 
- सुरेश भोळे, आमदार. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT