उत्तर महाराष्ट्र

खडसेंनाच न्याय न देणारे तुम्हाला काय न्याय देतील? : गुलाबराव पाटील

सकाळवृत्तसेवा

 
जळगाव : भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना न्याय देऊ शकला नाही, तो पक्ष तुम्हाला काय न्याय देईल, त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका, शिवसेनेलाच मतदान करा, असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील हुडको व हरिविठ्ठलनगरात आज शिवसेनेच्यावतीने जाहीर सभेचे आयोजन केले होते. 
प्रभागाच्या प्रचारासाठीच्या सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनातील जाहीर सभेला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुंबई येथील शिवसेनेचे उपनेते हाजी आराफत शेख, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, जवळेकर महाराज, आर. ओ. पाटील, अनिल अडकमोल, गजानन मालपुरे, राजू मोरे उपस्थित होते. हुडको व हरिविठ्ठलनगरातील प्रचार सभेत बोलताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले, ते म्हणाले की एका वर्षात विकास घडविण्याचे आश्‍वासन देणारा हा पक्ष विश्‍वासार्ह नाही. त्यांच्याच पक्षाचे नेते खडसे यांना हा पक्ष न्याय देऊ शकलेला नाही, तुम्हाला काय न्याय देणार. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी रस्ते, शाळा, हॉस्पिटल, पाणी, अशा सर्व पायाभूत मूलभूत सेवासुविधा जनतेला मिळवून देण्यासाठी आम्ही चाळीस वर्षांपासून वचनबद्ध होतो व भविष्यातही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेला मतदारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT