उत्तर महाराष्ट्र

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार : खडसे 

सकाळवृत्तसेवा

भुसावळ : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल ही काळ्या दगडावरची रेष आहे असा विश्‍वास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. भुसावळ येथे लोणारी मंगल कार्यालयात आज झालेल्या बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. 
श्री. खडसे म्हणाले, तुमचे सरकार येणार का असे विचारले तर कॉंग्रेसवाले नाही म्हणतात. भाजपला समर्थ पर्याय निर्माण होणे अत्यंत अवघड आहे आणि त्यामुळेच सध्या भाजपला अपराध्याच्या चौकटीत उभे करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु असल्याचे सांगितले. 

महाराष्ट्रात दीडशे जागा मिळतील 
तसेच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या दीडशे जागा निवडून येतील असे ठामपणे सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येत आहे. भाजप आणि शिवसेनेची युती होईल की नाही यावर चर्चा सुरु आहे. युती होईल असे वरिष्ठ पातळीवर म्हणणे आहे आणि युती तुटली तरी दीडशे जागा निवडुन येतील असा विश्‍वास व्यक्त केला. स्व. गोपीनाथ मुंढे, नितीन गडकरी, सुधीर मुनगुंटीवार आणि मी भाजपला निवडुन आणण्यासाठी जीवाचे रान केले आहे. 

शिवसेनेची कर्जमाफीची भुमिका 
कर्जमाफीमध्ये घोटाळा आहे असे शिवसेनेला वाटते तर तसा विरोध त्यांनी कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत करणे गरजेचे आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देतात आणि बाहेर जनतेसमोर वेगळे सांगतात हे योग्य नाही. शिवसेनेने योग्य स्थानी आपले म्हणणे मांडावे असे म्हटले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती तोडण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला होता आणि तो पोहोचवण्याची जबाबदारी मला दिली होती, ती जबाबदारी मी पार पाडली असा खुलासा केला. सध्या पक्षात चांगली माणसे येत आहेत असे कोणाचेही नाव घेता सांगितले आणि नाभाभाऊ पुन्हा मंत्री का झाले नाही हा प्रश्‍न सोडून काहीही विचारा असे कार्यकर्त्यांना शेवटी आवाहन केले. 
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, सभापती प्रीती पाटील, युवराज लोणारी, पुरुषोत्तम नारखेडे, मुन्ना तेली आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT