उत्तर महाराष्ट्र

समांतर रस्त्यांसाठी दिवाळीनंतर जनआंदोलन 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः शहरातील महामार्ग क्रमांक सहाला समांतर रस्ते अद्यापही झालेले नाही. दिवसेंदिवस हा प्रश्‍न बिकट होत आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असतानाही समांतर रस्त्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. केवळ या रस्त्यांचे श्रेय माजीमंत्री एकनाथराव खडसे यांना मिळायला नको म्हणून "डीपीआर' तयार होतोय असे सांगत समांतर रस्त्यांचे कवित्व सत्ताधारी करताहेत. समांतर रस्त्याबाबत दिवाळीपर्यंत निर्णय न झाल्यास कॉंग्रेसतर्फे जनआंदोलन पुकारले जाईल, असा इशारा जळगाव फर्स्टचे डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

भाजपने विधानसभा, लोकसभा, महापालिकेच्या निवडणुकीत समांतर रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावू असे आश्‍वासन दिले होते. परंतु साडेचार वर्षांपासून केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत असूनही भाजपचे लोक प्रतिनिधी हा प्रश्न जमिनीवर काम सुरू करून सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. 
दर पंधरा दिवसांनी भाजपचा कोणतातरी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री पत्रक काढतात, फोटो काढतात व सांगतात की समांतर रस्त्यांचे काम आठ दिवसात सुरू होणार. 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल आदींनी गेल्या दोन वर्षात हा प्रश्न मार्गी लागल्याचे जाहीरपणे त्याचे श्रेय घेतले. "जे बोलतो ते करतो' अशी ख्याती असलेले श्री. खडसेही याला अपवाद नाहीत. त्यांनीही कधी जळगावात तर कधी दिल्लीत जाऊन हा प्रश्न मी मार्गी लावल्याच्या घोषणा केल्या आहेत. आजपर्यंत तरी समांतर रस्त्याबाबत त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. 

ट्‌विटरद्वारे रस्त्यांच्या कामाची आठवण 
आधी म्हणे 365 कोटी, मग 100 कोटी, मग 125 कोटी, मग 139 कोटी ....कधी या डीपीआरची रक्कम निश्‍चित होईल. पण कधी काम सुरू होईल हे भाजपचे नेतेच जाणो. गेल्या 600 दिवसांपासून रोज नियमितपणे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांना, मंत्रालयाला ट्‌विटरद्वारे समांतर रस्त्यांच्या कामाची आठवण देत आहोत. 
 
सत्ताधाऱ्यांकडूनच प्रश्‍न लांबणीवर 
हा प्रश्न जर डीपीआर मंजूर होऊन, निविदा निघून मार्गी लागला नाही, तर शहर वासियांशी, सामाजिक, राजकीय संघटन यांच्याशी चर्चा करून पुन्हा जनआंदोलन उभे केले जाईल. जळगावच्या कामांना ठेकेदार का मिळत नाही? याबद्दल संशयाची सुई, सत्ताधारी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे जात असल्याचा आरोपही डॉ. चौधरी यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT