उत्तर महाराष्ट्र

आघाडीबाबत कॉंग्रेसच्या धोरणाची प्रतिक्षा ः प्रकाश आंबेडकर 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः भारीप बहुजन महासंघाची कॉंग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भातील समझोत्यावरील चर्चा सध्या थांबलेली आहे. कारण आरएसएसने 2024 मध्ये संविधान बदलण्याची भुमिका घेतली असून, ते एक मनोवादी संविधान आणण्याच्या प्रयत्नात आहे. या संविधान बदलाबाबत कॉंग्रेसचे काय धोरण आहे. याचा अजेंडा अद्याप दाखविलेला नाही. परंतू बहुजन पार्टीने जेथे उमेदवार जाहीर केले, तेथील माघार राहणार नाही. यामुळे कॉंग्रेसकडून जोपर्यंत धोरण स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आघाडीबाबत चर्चा होणार नसल्याचे भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 
मुक्‍ताईनगरला आज होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्‍वभुमीवर जळगावात आले असताना त्यांनी संवाद साधला. अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या पत्रपरिषदेत आंबेडकर म्हणाले, की आरएसएस मनोवादी संविधान आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतू, आरएसएसला या संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी कॉंग्रेसकडे सत्ता जायला हवी. यामुळे कॉंग्रेसचा अजेंडा काय असणार? याची प्रतिक्षा आहे. आघाडीची चर्चा पुढे नेण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसने अजेंडा लवकर द्यावा. ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात आरक्षणावरून गैरविश्‍वास निर्माण झाला आहे.  
मोदी सरकारने खरेदी केलेल्या राफेल संदर्भात कॅगने पार्लमेंटला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल अर्धसत्य आहे. मनमोहन सिंग सरकारने केलेल्या डिलनुसार विमानाचे लाईफ सर्कल लक्षात घेवून केले होते. 25 वर्ष विमान सर्व्हिसनुसार त्याची किंमत निश्‍चित करण्यात आली होती. मुळात 125 ची आवश्‍यकता असताना केवळ 36 च खरेदी करण्यात आली. राफेल हा एक मोठा घोटाळा असून केवळ एका कंपनीला तारणारा करार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : मुंबईच्या गोलंदाजांनी केला टिच्चून मारा; लखनौचा निम्मा संघ गारद, सामन्यात रंगत

SCROLL FOR NEXT