उत्तर महाराष्ट्र

भुसावळ विभागाला 1 हजार 53 कोटींचे उत्पन्न 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः भुसावळ रेल्वे विभाग आशिया खंडात सर्वांत मोठा विभाग म्हणून ओळखला जातो. देशभरातील रेल्वे पैकी मध्य रेल्वेचा भुसावळ दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न देणारा विभाग आहे. आतापर्यंत या विभागाने प्रवासी वाहतूक, माल वाहतुकीसह पार्सल, अन्नधान्याची वाहतूक, सिमेंट इतर वाहतुकीतून सुमारे 1 हजार 53 कोटी 91 लाखांचे उष्ठि मिळविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्‍क्‍यांनी उष्ठि कमी असले तरी मार्च अखेरपर्यंत एक हजार दोनशे कोटींचे उत्पन्न रेल्वेला मिळवून देण्याचे अधिकाऱ्यांनी ठरविले आहे. त्यासाठी ऍक्‍शन प्लॅन तयार केलेला आहे. 

प्रवाशांच्या माध्यमातून 535 कोटी 86 लाख, अन्य कारवाईतून 56 कोटी 89 लाख, पार्सलमधून 33 कोटी 55 लाख, लगेज वाहतुकीतून मधून एक कोटी, किरकोळ दंडातून 22 कोटी 34 लाख, मालवाहतूक करण्यातून (जसे कांदा वाहतूक, मका, गहू, तांदूळ, पोल, सिमेंट, इतर वस्तू) 461 कोटी 16 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. असे एकूण जानेवारी 2019 अखेर 1 हजार 53 कोटीचे उत्पन्न मिळविले आहे. 
 
भरारी पथकाची नेमणूक 
उत्पन्नाचे टारगेट एक हजार 169 कोटी 13 लाख आहे. अनधिकृत रित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंडात्मक वसुलीसाठी भरारी पथके रेल्वेने नेमली आहेत. लहान मोठ्या रेल्वे स्थानकावर विविध ठिकाणी टी.सी.ची नेमणूक करण्यात आले. रेल्वे फलाटावर फिरताना दहा रुपयांचे प्लटफार्म तिकीट काढावे लागते. ते जरी नसले तरी तो प्रवास करून आला असल्याचे समजून दंड वसुलीचा अधिकार रेल्वेला आहे. त्यानुसार दंड वसूल केला जात आहे. महिलांच्या डब्यात पुरुषांनी प्रवास करणे, योग्य श्रेणीचे तिकीट न घेता स्लिपर, ए.सी.तून प्रवास करणे, रेल्वेत धूम्रपान करणे आदी कारणांनी दंड वसूल केला जात आहे. 
 
पीपीपी अंतर्गत व्यापारी संकुल 
रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या विकासासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत पुणे, नागपूर रेल्वे विभागात कामे होत आहेत. भुसावळला वर्दळ असल्याने सध्यातरी नियोजन नाही. बसस्थानकाची जागा रिक्त होणार आहे. त्याठिकाणी प्रवाशांसाठी मार्केटिंग व्यापारी संकुल करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती डीआरएम आर. के. यादव यांनी दिली. 
 

रेल्वे स्थानकावर स्वच्छतेला अधिक महत्त्व देत आहे. प्रवाशांना विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत. स्लायडींग जिने, अद्ययावत लिफ्ट, रॅम्प सुविधा दिल्या आहेत. भुसावळ विभाग दिलेल्या उत्पन्नाच्या उद्दिष्ठांपेक्षा अधिक लक्षांक पूर्ण करेल. त्यादृृष्टीने नियोजन सुरू आहे. 
-आर. के. यादव डीआरएम (विभागीय रेल्वे प्रबंधक),भुसावळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT