उत्तर महाराष्ट्र

"शेळगाव बॅरेज' येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यातील "शेळगाव बॅरेज'चे काम सद्यःस्थितीत सुरू असून, कॉंक्रिटीकरणाची कामे केल्यानंतर त्याच्यासाठी काही कालावधी लागतो त्यानुसार काम केले जात आहे. या कामासाठी संपूर्ण निधीही प्राप्त झालेला आहे. त्यासाठी कोणतीही अडचण नाही. त्यामुळे डिसेंबर 2019 मध्ये "बॅरेज'चे काम पूर्ण होईल. शेतीसाठी पाणी वापराकरिता "कॅनॉल' तसेच इतर कामे पूर्ण होऊन मार्च 2022 मध्ये प्रत्यक्षात पाणी वापर सुरू होईल, अशी माहिती तापी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता एस. डी. कुळकर्णी यांनी दिली. 
"शेळगाव बॅरेजच्या जलपूजनाची घोषणा हवेतच' या मथळ्याखाली "सकाळ'ने आज वृत्त प्रकाशित केले. त्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एक जुलैला "शेळगाव बॅरेज'मध्ये पाणी अडवून त्याचे पूजन केले जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु अद्याप या "बॅरेज'चे काम संथगतीने सुरू असून, एक जुलैला पाणी अडविण्याची घोषणा प्रत्यक्षात येण्याची शक्‍यताच दिसत नाही. याबाबत मुख्य अभियंता कुळकर्णी यांनी सांगितले, की "बॅरेज'ची 175 ची लेव्हल वाढवून ती 191 पर्यंत वाढवायची आहे. मात्र, 175 च्या पुढील डिझाईन नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही. एक-दोन दिवसांत ते डिझाईन प्राप्त झाल्यानंतर पुढील काम सुरू होईल. मात्र, तरीही काम कोणतेही थांबलेले नाही. दुसरे काम गतीने सुरू आहे. परंतु कॉंक्रिटीकरणासाठी आवश्‍यक तेवढा वेळ द्यावाच लागतो. निधी संपूर्ण उपलब्ध असून, अद्याप बावीस कोटी रुपये शिल्लक आहेत. शिवाय नवीन अर्थसंकल्पातही निधीची तरतूद आहे. त्यामुळे हा निधीही उपलब्ध होईल. आता कामात कोणत्याही अडचणी नाहीत. त्यामुळे डिसेंबर 2019 मध्ये "बॅरेज'चे काम पूर्ण होईल. परंतु शेतकऱ्यांना पाण्यासाठी "कॅनॉल' तसेच इतर कामे पूर्ण करून या "बॅरेज'मधून 2022 मध्ये प्रत्यक्षात पाणी वापर सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT