उत्तर महाराष्ट्र

"बजेट'नुसार करावी लागणार "चॅनल्स'ची निवड! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : "ट्राय'ने ग्राहकांना आपल्या आवडीच्या चॅनल निवडीचे संपूर्ण अधिकार दिले असले, तरी विविध चॅनल्सच्या "पॅक'नुसार ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे सर्व "पॅक'चा अभ्यास करूनच ग्राहकांना "बजेट'नुसार चॅनल्सची निवड करावी लागेल. 
"डीटीएच'प्रमाणे प्रत्येक केबलधारकाला शासनाकडून "सेट टॉप बॉक्‍स' सक्तीचे करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांनी त्यांना शक्‍य होईल त्याप्रमाणे "सेट टॉप बॉक्‍स' लावून घेतला; परंतु आता टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)ने प्रत्येक केबलधारकासह "डीटीएच'धारकाला आवडीचे चॅनल्सची निवड करण्याचे अधिकार दिले आहेत. यामुळे ग्राहक जितके चॅनल निवडेल, तितक्‍याच चॅनल्सचे त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. "ट्राय'चे हे धोरण ग्राहकपूरक वाटत असले, तरी त्यामुळे ग्राहकांची छुपी फसवणूक होणार असल्याचे बोलले जात आहे. 
पूर्वी केबलधारकांकडून ग्राहकांना दोनशे रुपयांत 400 चॅनल्स दाखविण्यात येत होते. मात्र, आता तितकेच चॅनल्स बघण्यासाठी ग्राहकांना तीनपट अधिक पैसे लागणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मनोरंजनाच्या साधनांवर "ट्राय'च्या निर्णयामुळे एकप्रकारे कुऱ्हाड चालविली आहे. 

"बजेट'नुसार करावी लागणार निवड 
प्रत्येक नागरिक पगारावरून गरजेनुसार महिनाभराचे खर्चाचे नियोजन करीत असतो. "ट्राय'ने घेतलेल्या निर्णयामुळे आता ग्राहकांना आवडीच्या चॅनल्सचे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना "बजेट'नुसारच चॅनल्सची निवड करावी लागणार असल्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. 

"ट्राय'ने मोडले अनेकांचे कंबरडे 
दूरचित्रवाणी वाहिनीवर लागणाऱ्या कार्यक्रमांमधून अनेकांचे मनोरंजन होत असते. प्रत्येक घरात लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण मालिका, नाटक, कार्टून्स यांसह चित्रपट बघत असतो; परंतु आता मनोरंजनच महागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनोरंजनाचे साधन आता नकोसे होणार असल्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

"जीएसटी' कमी करा 
"ट्राय'च्या धोरणानुसार काही कंपन्यांकडून ग्राहकांना कमी पैशांमध्ये चॅनल्स बघता येणार आहे. मात्र, काही मोठ्या ग्रुपमधील चॅनल्सवर लागणाऱ्या मालिकांच्या "टीआरपी'नुसार दर ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना नाइलाजास्तव मनोरंजनासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत; त्याचप्रमाणे मनोरंजनावर लावण्यात आलेला 18 टक्के "जीएसटी' काही टक्‍क्‍यांनी कमी केल्यास सर्वसामान्यांना परवडणारे केबल व "डीटीएच'च्या दरात नक्कीच घट होणार असल्याची भावना केबल सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. 

"एचडी चॅनल्स'चे दर सर्वाधिक 
बाजारपेठेत आता एलईडी टीव्हींना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे पूर्वी असलेले मोठ्या आकाराचे टीव्ही आता कालबाह्य होत असल्याने प्रत्येकाच्या घरात आता एलईडी टीव्ही दिसून येत आहेत. या टीव्हीवर "एचडी चॅनल्स' सुस्पष्ट दिसत असतात. त्यामुळे ग्राहक "एचडी चॅनल्स'ला सर्वाधिक पसंती देत असतात; परंतु "ट्राय'च्या धोरणानुसार "रेग्युलर'पेक्षा "एचडी चॅनल्स'च्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT