vadu
vadu 
उत्तर महाराष्ट्र

वाळू चोरीस आता ग्रामपंचायतीच जबाबदार 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात रावेर तालुका वगळता इतर तालुक्‍यांतील ग्रामपंचायतींनी वाळू गटाचे लिलाव करण्याबाबत प्रस्ताव दिलेले नाहीत. ज्या ग्रामपंचायती वाळू लिलावाचे प्रस्ताव देणार नाही. अन दुसरीकडे त्याच वाळू गटातून वाळू चोरी होत असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित वाळू चोरीबाबत ग्रामपंचायतींना जबाबदार धरण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिला आहे. 


जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यापासून वाळूचे ठेके बंद आहेत. वाळू चोरी होऊ नये यासाठी महसूल विभाग प्रयत्न करीत आहेत. वाळू लिलाव लवकर होण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यातील ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मात्र अनेक ग्रामपंचायतीकडून अद्यापही वाळू लिलावाबाबत प्रस्ताव आलेले नाहीत. यामुळे वाळू चोरी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जर ग्रामपंचायतीने वाळू लिलाव होऊ दिले नाहीत, अन तेथे वाळू चोरी होत असल्याचे स्पष्ट झाल्यास ग्रामपंचायतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. 

पकडलेल्या वाहनांवर दंड अन गुन्हाही 
वाळू चोरी करणाऱ्यांना दंड करून केवळ सोडण्यात येणार नाही. तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. काही अधिकारी गुन्हा दाखल केला तर दंड करता येणार नाही, म्हणून गुन्हा दाखल करीत नाही. वाळू धोरणानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर दंडही करण्यात येईल. महसूल अधिकाऱ्यांनी वाळू चोरी करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करून दंडही घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

वाळू चोरीबाबत तक्रारी व्हाटसअपवर 

जळगाव जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकी संबंधित तक्रार करण्यासाठी व्हाट्‌स अप नंबर सुरू करण्याचे आदेश जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी आज दिले. त्या नूसार तक्रारी नोंदविण्यासाठी 8530472691 हा व्हाट्‌स अप नंबर सुरू करण्यात आलेला आहे. वाळू चोरीबाबत काही तक्रार असल्यास सदर व्हाट्‌सअप वर संदेश, जिओटॅगींगसह व्हिडिओ सादर करण्याचे आवाहन जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT