उत्तर महाराष्ट्र

गुन्हा दाखल होण्यास टाळाटाळ 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जळगाव तालुक्‍यातील वनजमीनीचे बनावट सात- बारा उतारे तयार करून परस्पर विक्री प्रकरणी चौकशी समितीला प्रतीक्षा आहे ती सह जिल्हा उपनिबंधक आणखी कोणीकोणी ही जमीन खरेदी केली त्याची. दरम्यान ज्यांनी वनजमीन दुसऱ्यांना विकली आहे त्यांच्यावर वनविभागाला सांगून गुन्हा का दाखल केला जात नाही ? या प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. सुमारे शंभर ते सव्वाशे कोटींच्या घोटाळ्यांचे हे प्रकरण जिल्हा प्रशासन धिम्या गतीने का घेते आहे? हा खरा प्रश्‍न समोर आहे. 

आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे वनजमिनीची परस्पर विक्री झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यात 2013 मध्ये 2 हजार 288 एकर वनजमिनीची बनावट दस्तऐवज व सातबारा उताऱ्यांद्वारे बेकायदेशीर विक्री झाली आहे. त्यात जळगाव, भुसावळ तालुक्‍यातील मौजे भागपूर शिवारातील गट क्रमांक 64, 65, 66, 76, 102, 121, 126, 135, 136 तसेच कंडारी शिवारातील गट क्रमांक 372, 12, 13 यासह उमाळे शिवार व परिसरातील वन जमिनी आहेत. 
याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने भागपूरचे तत्कालीन तलाठी आर. पी. बहादरे यांची सखोल चौकशी मागे झाली. त्यात त्यांनी सात बारा उताऱ्यावर माझी सही नसल्याचे सांगितले. यावरून ते बोगस सातबारे उतारे होते. 
 
संबंधित अधिकाऱ्याशी चौकशी व्हावी 
तलाठ्यांनी उतारे दाखविल्यानंतर त्यावर असलेली सही त्यांची नसल्याचे सांगितले. यावरून संबंधित जमिनीचे उतारे बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते उतारे कोणी तयार केले ? त्याअनुषंगाने महसूल विभाग तत्कालीन तलाठ्यांसह सर्कल, इतर अधिकाऱ्यांची चौकशी का लावत नाही? असा प्रश्‍न आहे. ती चौकशी झाल्यास अनेक बाबी समोर येतील यात शंका नाही. 

आतापर्यंत चौकशी समितीने सह जिल्हा उपनिबंधकांकडून खरेदी व्यवहाराची लेखी माहिती मागितली होती. त्यात गट क्रमांक 64, 65, 66 वनजमिनी गटांचे खरेदी विक्री केल्याचे दिसून आले. गट क्रमांक 64- पुंडलिक शिरोडे, गट क्रमांक 65-द्वारकाबाई शिरोडे (दोघे रा. नूतन वर्षा कॉलनी, जळगाव), गट क्रमांक 65-महिराजबी शेख सत्तार (रा.शाहू नगर, जळगाव) यांनी या जमिनी अनुक्रमे तीन लाख 33 हजार, 4 लाख 12 हजार, 2 लाख 57 हजारांत रूपेश भिकमचंद तिवारी (रा. इंद्रप्रस्थनगर), किरण भागवत खडके (रा.विठ्ठल पेठ, जळगाव) यांना विकल्याची स्पष्ट झाले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT