jalgaon zp
jalgaon zp 
उत्तर महाराष्ट्र

अनधिकृत खातेवाटपाचा घोळ मिटवत केले पुर्ववत! 

सकाळ वृत्तेसवा

जळगाव : जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीनंतर आज खातेवाटप करण्याचे काम करण्यात आले. यात मागच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनधिकृतपणे झालेले खाते वाटपाचा घोळ मिटवून नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांनी खाते वाटप पुर्ववत करण्याचे काम केले. यासोबतच विषय समितीतील रिक्‍त जागांवर सदस्यांची नावे देखील निश्‍चित करण्यात आली. या प्रक्रियेत कॉंग्रेसच्या अरूणा पाटील यांनी स्थायी समितीसाठी भरलेला अर्ज मागे घेतल्याने प्रक्रिया बिनविरोध पार पडली. 


जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर 6 जानेवारीला विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली होती. यातून महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण सभापती वगळता उपाध्यक्षांसह दोन सभापतींना खाते वाटप करायचे बाकी राहिले होते. खातेवाटपासाठी आज (ता.28) अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. छत्रपती शाहू महाराज सभागृहात सदर विशेष सभा घेण्यात आली. सभेला उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, सभापती जयपाल बोदडे, ज्योती पाटील, रवींद्र पाटील, उज्ज्वला माळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदीवे उपस्थित होते. 

उपाध्यक्षांकडे बांधकाम आणि अर्थ 
उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याकडे आता बांधकाम आणि अर्थ समितीचे खाते देण्यात आले आहे.  रवींद्र सुर्यभान पाटील यांना शिक्षणसह क्रीडा व आरोग्य समिती देखील देण्यात आले. तसेच कृषी- पशुसंवर्धन दुग्धशाळा विभाग उज्ज्वला प्रशांत माळके यांच्याकडे देण्यात आला. स्थायी समिती सदस्यपदासाठी अमित महेश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. 

समिती सदस्यपदी यांची वर्णी 
खाते वाटपात विषय समित्यांच्या रिक्त जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती- अमित देशमुख, जलव्यवस्थापन समिती- रजनी चव्हाण, कृषी समिती- दिलीप पाटील, एरंडोल पं.स. सभापती शांताबाई महाजन, मुक्ताईनगर पं.स. सभापती प्रल्हाद जंगले, जामनेर पं.स.सभापती सुनंदा पाटील, समाजकल्याण समिती- नंदकिशोर महाजन, प्रभाकर गोटू सोनवणे, भुसावळ पं.स. सभापती मनिषा पाटील, पारोळा पं.स. सभापती रेखाबाई भिल, शिक्षण समिती- पोपट भोळे, बांधकाम समिती- बोदवड पं.स. सभापती किशोर गायकवाड, वित्त समिती- यावल पं.स.सभापती पल्लवी चौधरी, आरोग्य समिती- जळगाव पं.स. सभापती नंदलाल पाटील, पाचोरा पं.स.सभापती वसंत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT