residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

नवरात्रोत्सवात कालिकामातेचे तत्काळ पेड दर्शन ,विश्स्तांचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

नाशिकः काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवात ग्रामदैवत कालिकादेवीच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या वर्षीपासून प्रथमच पेड दर्शन करण्याचा निर्णय कालिका मंदिर विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

नाशिककरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकादेवी मंदिर विश्‍वासाची यात्राकाळातील नियोजनासंदर्भात कालिका मंदिर सभागृहात नुकतीच बैठक झाली. तीत बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. कालिकादेवीच्या यात्रेत नाशिक शहर, जिल्ह्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, मुंबई, नगर, पालघर, वाडा, सुरत आदी ठिकाणाहून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दूरवरून येणाऱ्या भाविकांसह स्थानिक भाविकांना गर्दीमुळे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे "तत्काळ पेड दर्शन' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

प्रतिवर्षी कालिकादेवी मंदिर संस्थानतर्फे या वर्षी भाविकांना सुविधा देण्यात येणार आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून बेटी बचाव अभियान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, अवयवदान, प्लास्टिक बंदी, गोवंश जतन व पालन, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे यावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा मानस मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील यांनी व्यक्त केला. या कामात विश्‍वस्तांसह नाशिककरांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. ग्रामदैवत कालिकादेवी मंदिर संस्थानचे सरचिटणीस डॉ. प्रतापराव कोठावळे, खजिनदार सुभाष तळाजीया, भय्यासाहेब कोठावळे, यादवराव पाटील, किशोर कोठावळे, सुरेंद्र कोठावळे, आबा पवार, दीपक तळाजीया, सतीश कोठावळे, कृष्णा कोठावळे, राम पाटील आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT