live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

दारूबंदीसाठी महिला झाल्या रणरागिणी

दीपक कच्छवा

मेहुणबारे : जामदा (ता. चाळीसगाव) गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारूसह सट्टा, मटका, जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत. ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काही महिलांना वैधव्य प्राप्त झाले आहे. वारंवार मागणी करुनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील सुमारे दोनशे महिलांनी रणरागिणी होऊन पोलीस ठाण्यावर धडक दिली. गावातील सर्व प्रकारचे अवैध दहा दिवसात बंद झाले नाही तर पोलीस अधीक्षकांकडे दाद मागू, असा इशारा महिलांनी दिला.
येथून सहा किलोमीटरवर असलेल्या जामदा गावात गेल्या अनेक दिवसांपासून गावठी दारू खुलेआम विकली जात आहे. सोबतच सट्टा, मटका, जुगारासारख्या अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अनेक कुटुंबातील कर्ता पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना त्रास होत आहे. या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून गावातील सुमारे दोनशे महिला पोलीस ठाण्यात आल्या. ‘आमच्या येथील दारूविक्री बंद करा’ अशी मागणी करीत संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पोलिसांना निवेदन
सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी महिलांनी निवेदनही दिले. उपस्थित महिलांनी आपल्या व्यथा मांडताना अवैध धंद्यांमुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली असून दारूमुळे दरवर्षी तीन ते चार जण मृत्युमुखी पडत असल्याचे सांगितले. दारूमुळे मृत्यू आलेल्या एकाच्या विधवा पत्नीने आपला संसार कसा उद्ध्वस्त झाला याची आपबिती सांगितली. काहींनी दारु विक्रेत्यांपासून संरक्षण द्यावे, अशी साद घातली. महिला संतप्त झालेल्या असल्याने काही वेळ वातावरण गंभीर बनले होते. श्री. बेंद्रे यांनी कारवाईचे ठोस आश्‍वासन दिल्याने महिला माघारी फिरल्या.

‘भिऊ नका ताई मी तुझा मोठा भाऊ आहे’
जामदा (ता. चाळीसगाव) येथील भारती पाटील यांच्या पतीचे दारूमुळे निधन झाले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या समोर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत ‘आम्हाला संरक्षण द्यावे’ अशी आर्त विनवमी केली. त्यावर श्री. बेंद्रे यांनी ‘ताई, मी तुमचा पाठीराखा भाऊ असून घाबरू नका’ असे सांगत धीर दिला. आठ दिवसात अवैध धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले. पोलीस ठाण्यातील कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याने याबाबतीत हलगर्जीपणा केला किंवा कोणाकडे पैसे मागितले तर माझ्याकडे निःसंकोचपणे तक्रार करावी, असे सांगून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचेही आश्‍वासन दिले.

दारूमुळे होताहेत संसार उद्ध्वस्त
उषाबाई मोरे ः गावात दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. आमच्या गावात काही ठिकाणी पत्त्यांचा जुगार सर्रास खेळला जातो. त्यामुळेही दारूचे व्यसन अनेकांना जडते. माझ्या कुटुंबात दारुमुळेच दररोज वाद होतात. गावातील दारु हद्दपार करण्यासोबतच पत्ते, सट्टा चालविण्यावरही कारवाई करावी. लवकरच आम्ही महिला जिल्हा पोलीस अधीक्षकांनाच भेटणार आहोत.

लहान मुलांनाही गुटख्याची सवय
आशाबाई कोळी ः आमच्या गावात अठरा वर्षांखालील लहान मुले देखील दारूच्या आहारी जात आहेत. दारूसोबत गावात सर्रासपणे गुटखा विकला जातो. त्याची तर लहान मुलांनाही सवय लागली आहे. गुटखा बंदी असली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. दारूबंदी विभागाने तर आजपर्यंत एकही कारवाई केलेली नाही. आमच्या गावाबरोबर शेजारच्या गावातही गुटखा व दारूबंदी करावी.

दारूमुळे महिला होताहेत विधवा
भारती पाटील ः दारूमुळेच माझ्या पतीचे निधन झाले. दरवर्षी आमच्या गावातील चार ते पाच जणांचा केवळ दारूमुळे मृत्यू होतो. इतक्या राजरोसपणे दारु विकली जाते. शिवाय अवैध धंदेही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. दारूमुळे महिलांचे कुंकू पुसले जात असतानाही पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असतात. दारुसोबतच सट्टा, मटका, जुगारासारख्या अवैध धंद्यांवरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT