bhasyashree snake bite
bhasyashree snake bite 
उत्तर महाराष्ट्र

अंगणात खेळता खेळता चिमुकलीने पकडला सर्प यातच तिचा गेला जीव 

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : मितावली (ता. चोपडा) येथील दोन वर्षीय भाग्यश्री संजय इंगळे घरासमोरील ओट्यावर खेळत असतांना सर्प चावल्याने तिचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. 
मितावली गावातील या घटनेने इंगळे परिवार सुन्न झाला. आई घरात काम करत असल्याने दोन वर्षाची मुलगी भाग्यश्री ही खेळत घराच्या ओट्यावर आली. खेळत हसणाऱ्या मुलीचा अचानक रडण्याचा आवाज ऐकून तिची आई भारती इंगळे या बाहेर आल्या. मुलीच्या हाताला रक्त लागल्याचे पाहून व तिच्या तोंडातून फेस आल्याने तिला सर्प चावल्याची शंका आली. मुलीचे वडील संजय विक्रम इंगळे व शेजारील लोकांनी मुलीला तात्काळ चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भाग्यश्रीला मृत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. पोलीस विभागातर्फे पंचनामा करण्यात आला. डॉ. पंकज पाटील यांनी शवविच्छेदन करून मुलीचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. यावेळी गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर, सर्पमित्र सागर बडगुजर, गिरीराज ग्रुपचे दिपक पाटील, मितावलीचे माजी सरपंच चंपालाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोदकुमार कोळी उपस्थित होते. 

दोन वर्षापुर्वी आईलाही सर्पदंश 
विशेष म्हणजे दोन वर्षापुर्वी सर्पदंश झालेल्या मुलीच्या आईला त्याच ठिकाणी सर्पदंश झाला होता. त्यांच्यावर तात्काळ जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करून जीव वाचविण्यात यश आले होते. काही दिवसांपुर्वी तेथेच सर्प निघाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. 

तासाभराने पकडला विषारी सर्प 
सर्पमित्र सागर बडगुजर यांनी घटनेची सविस्तर माहिती घेऊन तेथील ग्रामस्थांशी भ्रमणध्वनीवर सर्प पकडण्यासाठीची योजना सांगितली. दवाखान्यात मुलीचे शवविच्छेदन सुरू होते, तर तिकडे ग्रामस्थांचे साप पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. सर्पमित्र सागर बडगुजर यांनी सांगितल्याप्रमाणे तासाभरात अथक प्रयत्नांनी ग्रामस्थांसमोर पाच ते सात फुटाचा काळा रंगाचा विषारी सर्प पकडण्यात यश आले. यावेळी सारा गांव त्याच ठिकाणी जमा होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT