उत्तर महाराष्ट्र

गाडी येताच नातेवाइकांनी पळविली ऑक्सिजन सिलिंडर 

धनराज माळी

नंदुरबार  : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा रुग्णालयात बेड फुल झाले असून, मोठ्या प्रमाणावर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पामधून दररोज निर्माण होणारा ऑक्सिजन आता रुग्णसंख्येच्या तुलनेने तोकडा ठरू लागल्याने परजिल्ह्यातून ऑक्सिजन सिलिंडर मागवावी लागत आहेत. यामुळे उपचार घेणाऱ्या आपल्या रुग्णाला सिलिंडर मिळेल किंवा नाही, याची धास्ती असल्याने हॉस्पिटलबाहेर उभ्या असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांनी शुक्रवारी (ता. ९) दुपारी ऑक्सिजन सिलिंडरचे वाहन आल्यावर अक्षरश: सिलिंडर पळविल्याचे दिसून आले. हा प्रकार तिसऱ्यांदा घडल्याचे बोलले जात आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. 


नंदुरबार जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह येण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयही रुग्णांनी फुल झाले आहे. जिल्हा रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच आता अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने सर्वांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाची दमछाक होत आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असून, त्यातून निर्माण होणारा ऑक्सिजन रुग्णांच्या तुलनेने तोकडा ठरत असल्याने बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर मागवावी लागत आहेत. सिलिंडर एका वाहनातून आणण्यात येतात. शुक्रवारी सकाळी अकराला सिलिंडरचे वाहन आल्यावर रुग्णांच्या नातेवाइकांनी सर्व सिलिंडर पळविली. आपल्या रुग्णाला ऑक्सिजन मिळेल किंवा नाही, या भीतीने तेथे असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची झुंबड उडाली होती. ही बाब गांभीर्याने घेऊन रुग्णालय प्रशासनाने नियोजन वा बंदोबस्त करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने शुक्रवारी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास ऑक्सिजन घेऊन येणारे वाहन आल्यावर रात्रभर या वाहनाची वाट पाहणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची एकच झुंबड उडाली. मिळतील तेवढी ऑक्सिजन सिलिंडर ताब्यात घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न दिसून आला. सलग दोन ते तीन वेळा हा प्रकार घडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आणखी नातेवाइकांची अशीच झुंबड उडून वाद उद्‍भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT