accident
accident 
उत्तर महाराष्ट्र

सटाणा-मालेगाव रस्त्यावर अपघातात 7 जण जागीच ठार

रोशन खैरनार

सटाणा : शहरापासून चार किलोमीटर अंतरावर शेमळी गावानजीक सटाणा-मालेगाव रस्त्यावर आज (गुरुवार) पहाटे ६ वाजेच्या सुमारास ट्रक व एपे रिक्षा यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार झाले. अपघातात सर्व मृतांचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर अज्ञात ट्रकचालक फरार झाला असून सटाणा पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

या मृतांमध्ये ४ परप्रांतीय तर चालकासह ३ जण मालेगाव, चोपडा व अंमळनेर येथील रहिवासी असून सर्व सटाणा येथे सध्या सुरु असलेल्या यात्रोत्सवात छोटे व्यावसायिक आहेत. या भीषण अपघातामुळे यात्रोत्सावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सटाणा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार : सटाणा यात्रोत्सवातील सहा छोटे व्यावसायिक यात्रोत्सवाचा माल घेण्यासाठी काल (ता.२७) रोजी मुंबई येथे गेले होते. मुंबई येथून मध्यरात्री ते सर्व रात्री लक्झरी बस ने मालेगाव येथे आले. पहाटे मालेगाव येथे उतरल्यानंतर इतर कोणतीही सुविधा नसल्याने त्यांनी सटाणा शहराकडे येण्यासाठी संजय दामुआप्पा पंधाडे (४०, अयोध्यानगर, मालेगाव) यांची एपे रिक्षा (एम.एच.४१ व्ही. १५५९) भाड्याने घेतली. मालेगाव - सटाणा रस्त्यावरील शेमळी गाव ओलांडून पुढे सुकड पुलाजवळील अवघड वळणावर रिक्षा येताच भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचा चुराडा होऊन ती रस्त्याच्या कडेला झुडुपात फरफटत जावून पडली. तर रिक्षातील चालकासह सर्व सात जण चिरले जाऊन जागीच ठार झाले. सर्व मृतांचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला होता. काही मृतदेह तर रस्त्यावर पडले होते.

अपघातानंतर काही वेळातच यावलहून मालेगावमार्गे सटाण्याकडे परतत असताना एका खासगी रुग्णवाहिकेचे चालक कल्पेश निकम यांना झालेला अपघात व रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह दिसले.  त्यांनी त्वरित सटाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक हिरालाल पाटील यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री.पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक के.बी.घायवट व इतर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वी घटनास्थळी पोहोचलेल्या कल्पेश निकम, पालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे, निलेश पाकळे, अनिल पाकळे, चंदू देवरे, राहुल शेलार यांनी सर्व मृतांना रिक्षामधून बाहेर काढण्यास मदत केली.

या भीषण अपघातातील मृतांमध्ये चालक संजय दामुआप्पा पंधाडे (४०, अयोध्यानगर, मालेगाव), अलीम शेख तायर (३४, मण्यार गल्ली, चोपडा, जळगाव), अशोक शंकर देवरे (५५, पारोळा रोड, अमळनेर, जळगाव), राजेशकुमार शंकरदास गुप्ता (२८), कैलास प्रसाद अर्जुन (२८) व मोहम्मद जल्लू मोहम्मद लखन (४०, सर्व रा.करमपुरा, ता.तलसाडी जि.साहेबगंज, झारखंड), रहेमतुल्लाभाई गोहर आशमी पानवाला (६०, इनामपूर, ता.कोठान जि.जौनपुर, उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT