horse
horse 
उत्तर महाराष्ट्र

येवल्यात २५ फेब्रुवारीला रंगणार नामांकित घोड्यांच्या शर्यती

संतोष विंचू

येवला : काठेवाडी,पंजाब व माळवा जातीचे भारदास्त देहयष्टी, नखरेबाजपणा अन रुबाबदार असे लक्ष्मी, बसंती, राणी तर मुन्ना, मोती, चेतक हे अश्व येथील भूमीत धावणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी २५ फेब्रुवारी रविवार रोजी येथे  घोड्यांवर बसून शर्यतीच्या स्पर्धा रंगणार आहे. आकर्षण असलेले घोडे स्पर्धेसाठी आदल्या दिवशीच दाखल होणार आहेत.

राज्यभर आठवडे बाजाराच्या दिवशी दर मंगळवारी घोडे बाजार भरणारे हे एकमेव शहर असून दर बाजार समितीच्या आवारात खरेदी -विक्रीचा अधिकृत बाजार भरत असतो. त्यामुळे येवला शहरात देशभरातून घोडे खरेदीसाठी शौकीन येतात.ऐतिहासिक परंपरा जपलेल्या या शहरातील घोडे शौकिनानी घोड्यावर बसुन स्पर्धा घेण्याची परंपरा सुरू केली असून या स्पर्धेचे आकर्षण आता मोठया प्रमाणावर वाढू लागले आहे.

रविवारी नांदगाव मार्गावरील वडगाव रेल्वे गेटजवळ भव्य मैदानावर सकाळी ९ वाजेपासून  ही अनोखी स्पर्धा दिवसभर रंगणार आहे.स्पर्धेसती कच्छ भुज, पालिताना, सुरत,  अहमदाबाद यासह मुंबई, नेरुळ, अलिबाग, पुणे, बारामती, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, चाळीसगाव, मालेगाव, नाशिक याठिकाणचे घोडे आणि घोडेस्वार सहभागी होणार आहेत.

स्पर्धेतील प्रथम विजेत्यास ५१ हजारांचे तर द्वितीय विजेत्यास ३१ हजार,तृतीय २१ हजार,चतुर्थ क्रमांकास  ११ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धक घोड्यास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे विशेष आकर्षण नेरुळ येथील सरपंच गोल्डमन भगवान चंचे,येवल्याचे गोल्डमन पंकज पारख यांची उपस्थिती असनार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नगरसेवक झामभाऊ जावळे (९४२२७५६२८८), पप्पू गांगुर्डे(९८५०२३१६५०), पिंटू परदेशी(७७०९५११६६९), सरपंच पोपट वाघ (९०११६२८८५१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT