Marathi news Nashik news in Marathi Nandgaon student republic day parade
Marathi news Nashik news in Marathi Nandgaon student republic day parade  
उत्तर महाराष्ट्र

नांदगावचा विद्यार्थी दिल्लीतील संचलनात सहभागी होणार

सकाळवृत्तसेवा

नांदगाव : येथील नशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नशिक संचालित व्ही. जे. हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्रसेनेचा छात्र सार्जंट आकाश रोहम याची २६  जानेवारी २०१८ प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावर  होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी महाराष्ट्राच्या चमूमध्ये निवड झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून ज्युनिअर डिव्हिजनचे फक्त ८ छात्र निवडले जातात. त्यात त्याचा समावेश आहे. त्याची निवड औरंगाबाद ग्रुपमार्फत झाली आहे. गेले अडीच महिने तो औरंगाबाद येथे कठोर प्रशिक्षण घेतो आहे. अजुन १ महिना औरंगाबाद येथे प्रशिक्षण घेवून २४ डिसेंबर २०१७ ला महाराष्ट्राचे एनसीसी पथक दिल्लीला रवाना होणार आहे. तिथे भारतातील राष्ट्रीय छात्रसेनेचे १७ विभाग सहभागी होतील व त्यांच्यात तिथे स्पर्धा होईल.

आकाश हा उत्तम तबला वादक असून सांस्कृतिक कार्यक्रमात तो महाराष्ट्राच्या चमूचे प्रतिनिधित्व देखील करणार आहे. विद्यालय व संस्था शतक महोत्सव साजरा करत असताना आकाशची झालेली निवड शाळेसाठी व संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. आकाश हा या संचलनासाठी निवड झालेला शाळेच्या इतिहासातील पहिलाच छात्र आहे.  त्याच्या या निवडीबद्दल औरंगाबाद ग्रुपचे ग्रुपकमांडर ब्रिगेडियर जगदीश चंद्रन, ५० महाराष्ट्र बटालियनचे कमांडींग ऑफिसर कर्नल धर्मेश यादव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

विद्यालयात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे,विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे ,उपमुख्याध्यापक संजय पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT