yeola
yeola 
उत्तर महाराष्ट्र

सैन्यदल, पोलिस भरतीच्या प्रशिक्षणासह सरावासाठी उभारला तळ

संतोष विंचू

येवला : गावातील नव्या दमाच्या तरुणाना मार्गदर्शन मिळावे,त्यांचात देशभक्तीची बीजे रुजावी यासाठी नांदेसर येथील मैनुद्दीन शेख या सैन्य दलात अभियंता असलेल्या तरुणाने अनेखा उपक्रम हाती घेतला आहे. गावातील आजी-माजी सैनिक तरुणांना एकत्रित करत शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने गावातील तरुणांसाठी सैनिक आणि पोलिस भरतीसाठी ते मार्गदर्शन करणार आहे.यासाठी सुसज्ज असा प्रशिक्षण तळ देखील उभारला आहे.

डीजेच्या तालावर नाचणे नाही अन लाऊडस्पीकरचा गोंगाट नाही..ना फटाक्यांचा धूर छत्रपतींच्या भगव्या बरोबर तिरंग्याला वंदन करून,बालोपासना करून देशाच्या सीमेवर सेवेची संधी मिळविण्यासाठी सुरू असलेली धडपड...हे चित्र नांदेसर येथे नजरेत साठवणारे होते.छत्रपती श्री. शिवाजी महाराज रयतचे राज्य कसे असते ते जगाला दाखवून देणारे प्रथम व एकमेव महापुरुष यांचा जन्मोत्सव, आम्हा सर्वांना व महाराष्ट्राच नव्हे तर भारताला अभिमान वाटणारा हा क्षण..याच दिवसाचं औचित्य साधुन गावातील आजी माजी सैनिक,सरपंच,ग्राम पंचायत सदस्य,गावकरी यांनी प्रशिक्षण तळ उभा केला तो केवळ सामाजिक बांधीलकीतून..!

सैन्यदलात नुकताच भरती झालेला युवा हरीभाऊ सदगीर यांच्या हस्ते महाराजांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. नामदेव बेंडके,सुनील आहेर हे निवृत्त जवान मार्गदर्शन गावातील तरुणांना प्रशिक्षण देणार आहेत.गावचे पोलीस पाटील सुनील वाघ यांनी लेखी परीक्षेसाठी विविध प्रकारची पुस्तके दिली. प्रशांत कहार आणि अमोल बेंडके हे लेखी परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी योगदान देत आहेत.तिरंग्याला वंदन करून गावातील मैदानात श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून मैदान साफसफाई करून सैन्य दलातील निकषांवर धावपट्टी,उंच उडी,लांब उडी,शरीर क्षमता वाढविण्यासाठी विविध प्रकारची व्यायाम साधने बसवली आहे.

सैन्य दलात तसेच पोलिस दलात भरती होण्यासाठी आवश्यक शारीरिक क्षमता चाचणीचा सराव करता यावा म्हणून स्वताःच्या श्रमदानातुन परीपुर्ण मैदान तयार केले आहे.गावच्या पोलिस पाटलांनी त्यांच्या या उपक्रमात सहभाग घेत युवकांना भरतीसाठी आवश्यक पुस्तके भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवत त्यांच्या भावी आयुष्यातील स्वप्ने पुर्ण करण्यासाठी हातभार लावला.गावातील आजीमाजी सैनिकांनी प्रशिक्षण साहित्य दिली व प्रशिक्षक म्हणून भुमिका पार पाडत आहेत.

“सैन्य दलाचे निकष पूर्ण करणारे परिपूर्ण सराव मैदान तयार झाल्याने गाव-परिसरातील तरुणांना फायदा होणार आहे.१४ वर्षांपासून मी सैन्य दलात मातृभूमीच्या सेवेत आहे.आपल्या गावातील तरुणांना सैन्यदलात अधिकाधिक संधी मिळाव्यात या साठी माझा प्रयत्न आहे.गावकऱ्यांच्या साथीने नक्कीच यश येईल.”
- मैनूद्दीन शेख,अभियंता, भारतीय सैन्य दल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT