satana 
उत्तर महाराष्ट्र

विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे व्यासपीठ : यतीन पाटील

सकाळवृत्तसेवा

नाशिक : विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर बागलाणचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे शासनाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पाटील यांनी आज केले.

खमताणे (ता.बागलाण) येथील ए.पी.जे. अब्दुल कलामनगरी गुरुकुल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आज ४३ व्या बागलाण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री.पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती विमलबाई सोनवणे, उपसभापती शीतल कोर, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सदस्य मीना मोरे, पंचायत समिती सदस्य वैशाली महाजन, कान्हू अहिरे, रतन आहेर, यशोदाबाई आहेर, गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, विस्तार अधिकारी पी.आर.जाधव, गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष प्रा.जितेंद्र आहेर, डॉ.दौलतराव गांगुर्डे, विज्ञान अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष रमाकांत भामरे, मुख्याध्यापक बी.एस.देवरे, संजय देसले आदी उपस्थित होते.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार यांनी व्यक्त केली. गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांनी प्रास्ताविकात शासनाचा प्रदर्शन भरविण्याचा उद्देश स्पष्ट केला. प्रा.जितेंद्र आहेर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

यतीन पाटील यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक ५२, माध्यमिक ६३, शैक्षणिक साहित्य गटातून ८, लोकसंख्या शिक्षण व प्रयोगशाळा परिचर गटातून ९ उपकरणांची मांडणी करण्यात आली आहे. आज दिवसभर तालुक्यातील विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन बघण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कार्यक्रमास गोरख आहेर, चेतना आहेर, दीपा आहेर, के.पी.पगार, पी.आर.देवरे, मुख्याध्यापक एस.डी.देवरे, अनिल जाधव, एस.टी.भामरे, सोपान खैरनार, प्रमोद रौंदळ, सोमदत्त मुंजवाडकर, बी.के.पाटील, सचिन शेवाळे, रोशन भामरे, विलास कापडणीस, मुकेश संगीत, रुपेश पाथरे, भालचंद्र अनारे, नितीन अहिरे, किशोर पवार, हेमंत खरे, मुश्ताक शेख, रुपेश देवरे, वैशाली देवरे, रविना बागुल, निकिता चव्हाण, शुभांगी सूर्यवंशी, पूनम शेलार, अश्विनी जाधव, दिपाली पवार, सुचिता बिरारी, जयश्री देसले, प्रेरणा भामरे, उज्ज्वला गुंजाळ, शीतल चव्हाण आदींसह विज्ञानप्रेमी शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. जितेंद्र भामरे यांनी सूत्रसंचालन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT