residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

पाण्यावरुन जिल्हा यंत्रणा महापालिकेत ताणाताणी 

सकाळवृत्तसेवा

नाशिक ः पाणी आरक्षणापूर्वीच्या तयारीच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी घेतलेल्या बैठकीत, महापालिका यंत्रणा 4600 दशलक्ष घनफूट पाणी 
आरक्षित ठेवण्याबाबत ठाम राहीली.तर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांशी बोलू नंतर महापालिकेच्या पाण्याचे ठरवू. असे सांगत महापालिका यंत्रणेच्या आधिकाऱ्यांना वाटेला लावले. 

पावसाच्या ओढीमुळे प्रशासकीय पातळीवरही पाण्याची ताणाताणी सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी आज पाणी आरक्षण आढावा बैठक पूर्वतयारीसाठी 
घेतलेल्या बैठकीत, त्याचे पडसाद उमटले. महापालिकेसह विविध यंत्रणांनी वाढत्या उन्हाच्या झळा व टंचाईचा संदर्भ देत, पाण्याच्या कपातीला ठाम विरोध दर्शविला उलट, नाशिक महापालिकेने वाढती लोकसंख्या, बाष्पीभवन, तरलती लोकसंख्येचा संदर्भ देत, यंदा 4600 दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी एवढे पाणी कसे ? असे विचारत, महापालिकेच्या आधिकाऱ्यांना तुमच्या वरिष्ठांशी व प्रसंगी महापालिका आयुक्तांशी बोलू असे सांगत महापालिकेच्या वाढीव पाण्याच्या मागणीबाबत नकारघंटा वाजविली. 

योग्य नियोजन करु 
पिण्याच्या पाण्यासाठी कुणाचीही अडवणूक होणार नाही, मात्र वाढीव मागणी केली म्हणून सरसकट तेवेढेही पाणी मिळणार नाही, असे संकेत देत, जिल्हाधिकाऱ्यांनी आज विविध यंत्रणाकडून त्यांची पाण्याची मागणी जाणून घेतली. जिल्ह्यात साधारण 50448 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यातील महापालिकेने 3900 दशलक्ष घनफूट
पाणी घ्यावे तसेच दारणेतील पाणी उचलण्याबाबत महापालिकेला आग्रह केला. एमआयडीसीने 231 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली. 

पाण्याची सरासरी मागणी 
नाशिक महापालिका 4600 दशलक्ष घनफूट 
मालेगाव शहर 1400 दशलक्ष घनफूट 
सातपूर,अंबड वसाहत 231 
एकलहरे वीज केंद्र 700 
मेरी आभियांत्रिकी केंद्र 75 

प्रमुख नगरपालिका व पाणीयोजना 
तोफखाना केंद्र 500 
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड 200 
नाशिक रोड जलशुध्दीकरण 400 

त्र्यंबकेश्‍वर पाणीयोजना 18 
सटाणा पाणीयोजना 80 
नांदगाव नगरपालिका 70 
मनमाड रेल्वे जंक्‍शन 187 
येवला 38 गाव योजना 200 
दिंडोरी औद्योगिक वसाहत 35 
निफाड ग्रामपंचायत 20 
लासलगाव 16 गावे 31 

पिण्याच्या पाण्याची सगळ्यांची गरज लक्षात घेउन कुणी पाण्याविना राहणार नाही, याचे नियोजन केले जाईल. पाणी आरक्षण बैठकीपूर्वी विविध यंत्रणाशी चर्चा करुन त्यांची 
पिण्याच्या पाण्याची गरज समजावून घेतली जात आहे. 
-राधाकृष्णन बी (जिल्हाधिकारी नाशिक) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT