live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

Vidhan sabha : महाराष्ट्राला देशातील नंबर वन करू : अमित शहा 

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : काँग्रेसच्या काळात महाराष्ट्राला निधी देताना सतत अन्याय केला, केंद्रातील भाजप सरकारने पांच वर्षात काँग्रेस च्या चारपट निधी दिला आहे. गेल्यावेळी केंद्र राज्यात भाजपला संधी दिली, आता पुन्हा केंद्रात दिली, राज्यातही पुन्हा एकदा भाजपची सत्ता रिपीट करा,महाराष्ट्र देशात एक no बनवू असे जोरदार आवाहन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केले.
नवापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारासाठी आज येथे झालेल्या विराट विजयी सभेत शहा बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उमेदवार भरत गावित, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित,  नेते कुवरसिंग वळवी, खासदार डॉ हीना गावित, यांच्यासह भाजपचे जिल्हा पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री शहा यांची राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारातील ही खान्देशातील एकमेव सभा होती, सभेस जिल्यातील आदिवासी बांधवांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती वातावरण बदलविणारी ठरली. काँग्रेसवर जोरदार टीका करताना हिम्मत असेल तर जनतेला आश्वासन देऊन पहा, की काँग्रेसची सत्ता आली तर कलम 370 पुन्हा लागू करु,, मग पहा जनता काय म्हणते. 
कुवरसिंग वळवी यांनी जोरदार भाषणात भाजप सरकारची धोरणे आणि काँग्रेसने कशी जनतेची दिशाभूल केली यावर घणाघाती हल्ला केला. आपणही यापूर्वी निवडणूक लढविली, पण तेव्हा तुम्ही मते दिली नाहीत,, आत्ता वेळ आली आहे, भरत भाऊंना प्रचंड मतांनी निवडून द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT