उत्तर महाराष्ट्र

नवापूरमध्ये होमक्वारंटाईनची संख्या चिंताजनक 

सकाळवृत्तसेवा

नवापूर : तालुक्यात आजअखेर १३३४ लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. दिवसागणिक ही संख्या वाढत असल्यने चिंताजनक आहे. आजमितीस तालुक्यात एकही व्हेंटिलेटर नाही. दुर्दैवाने एखाद दुसरा रुग्ण कोरोना बाधित निघाला तर प्रशासनाची धावपळ झाल्याशिवाय राहणार नाही. नागरिक संचारबंदीला जुमानत नाहीत. प्रशासनाने उपाययोजना करताना ही बाब लक्षात घेतली पाहिजे अन्यथा आरोग्ययंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे. 

नवापूर तालुक्यात सुदैवाने अद्याप एकालाही कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आली नाहीत. मात्र परप्रांतात कामानिमित्त गेलेले मोठ्या संख्येने परत येत आहेत. ही संख्या लक्षणीय आहे. ही संख्या अजून किती दिवस वाढेल हे आता सांगणे कठीण असल्याचे आरोग्य यंत्रणेचे मत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, व्हायरसची शृंखला खंडित व्हावी यासाठी संचारबंदी, लॉक डाऊन केलं आहे. मात्र येथील जनता अजूनही ते गांभिर्याने घ्यायला तयार नाही. 

नवापूर तालुक्यातून रोजगारासाठी स्थलांतरित करणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद झाल्याने नागरिक गावी येत आहेत. तालुक्यात आज अखेर होम क्वारोंटाइन ची संख्या १३३४ झाली आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आलेली नसली तरी दक्षता घ्यावी लागणार आहे. आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन केले आहे. मात्र इतर नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करतात. सकाळी असे निघतात जणू कोरोना व्हायरसची लागण दुपारून सुरू होते. दुपारी बारा एकपर्यंत सोशियल डिस्टन्सिंग अजिबात पाळत नाहीत. लोकांचे हे वर्तन सर्वांची डोकेदुखी ठरू शकते. 

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात एक आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. यात तीन बेड आहेत. मात्र एकही व्हेंटिलेटर नाही. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियनची पोस्ट नसल्याने व्हेंटिलेटरची सुविधा दिली नाही. कोरोना बाधित अथवा संशयित आढळला तर जिल्हा रुग्णालयात पाठवावे असे निर्देश आहेत. 

तालुका आरोग्य विभागाने आवश्यक सुविधांची मागणी केली आहे. मात्र अद्याप पुरवठा झालेला नाही. होम क्वारंटाईन केलेल्यांच्या तपासणीसाठी किमान पन्नास इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर, आरोग्य पथकाला पीपीई किट, ९५ या प्रकारतील दीड ते दोन हजार मास्क, ग्लोज, सॅनिटायझर आणि महत्त्वाचे किमान दहा व्हेंटिलेटरची गरज आहे. मात्र यासाहित्याचा अजूनही पुरवठा झालेला नाही. 

बाजार पुन्हा तेथेच कसा ? 
शहराच्या मध्यवर्तीभागात भऱणारा भाजीबाजार बाजार समितीच्या मोकळ्या जागे स्थलांतर करण्याचा निर्णय झालेला असताना आज विक्रेते पुन्हा तेथेच बसले आणि नागरिकांनाही कुठलाही समंजसपणा न दाखविता तेथेच गर्दी केल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. प्रशासन, पोलिस आणि आणि सारेच लोकप्रतिनिधी याची दखल घेतील का? 

नागरिकांनी तोडाला मास्क, सॅनिटायझर लावून कोरोनाला टाळता येणार नाही. त्यासाठी घरात बसणेच गरजेचे आहे हे आतातरी समजून घ्या. गरज नसताना बाहेर पडूच नका. भाजीपाला पुरेसा आहे. सर्व साठा पुरेसा आहे. नागरिकांनी एकच पथ्य पाळा, कृपया घराबाहेर पडू नका अशी माझी विनंती आहे. 
- शिरीषकुमार नाईक, आमदार, नवापूर. 

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी शासन आपल्यास्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. आपली नैतिक जबाबदारी म्हणून आता घरीच बसा. बाजारात विनाकारण गर्दी करू नका. चीनमधील विषाणू भारतात येऊ शकतो, तुम्ही घरात बसले नाहीत तर तो तुमच्यापर्यतही येऊ शकतो हे आतातरी ध्यानात घ्या मित्रांनो. 
- भरत गावित, जिल्हा परिषद सदस्य व माजी अध्यक्ष. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT