Wedding
Wedding 
उत्तर महाराष्ट्र

चिमुकल्या 'परी'ला मिळाले मातृछत्र

भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : जैताणे (ता.साक्री) येथील रहिवासी नानाभाऊ वामन देवरे यांचे विधुर पुत्र देविदास यांचा व नेर (ता.धुळे) येथील मूळ रहिवासी, सद्या जैताणेस्थित गोकुळ रुपचंद सैंदाणे यांची दिव्यांग भगिनी संगीता हिचा साखरपुड्यातच आदर्श विवाह झाला. समता परिषद व माळी महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने झालेल्या या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिव्यांग वधू संगीता ही जैताणे येथील एका अंगणवाडीत मदतनीस म्हणून कार्यरत आहे. देखणी व सुस्वरूप असूनही केवळ अपंगत्वामुळे तिचा विवाह जमण्यात अडचणी येत होत्या. काही वर्षांपूर्वीच मातृछत्र व पितृछत्र हरपलेल्या संगीताचा सांभाळ तिचे बंधू गोकुळ सैंदाणे, वहिनी संगीता सैंदाणे व पूनम सैंदाणे हे करत होते. नोकरीच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी त्यांनी तिला तीन चाकी वाहनही घेऊन दिले होते.

विधुर वर देविदास हा बांधकाम व्यावसायिक असून पत्नी व आई-वडिलांसह कष्टाने वाटचाल करत असताना अचानक डिसेंबर 2016 मध्ये कापडणे (ता.धुळे) येथील माहेरवाशीण असलेल्या पहिली पत्नी सुरेखा हिचा प्रसूतिदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून अवघी एका दिवसाची चिमुरडी कन्या 'मनीषा' उर्फ 'परी' हिचा आई सरुबाई यांच्या मदतीने सांभाळ करत जीवनाची खडतर, एकाकी वाटचाल करत होता. परंतु समता परिषद, माळी महासंघाचे कार्यकर्ते व उभयतांच्या नातेवाईकांच्या मध्यस्थीने दोघांच्याही जीवनात आशेचा किरण प्रकटला.

समता परिषदेचे कार्याध्यक्ष गोकुळ पाटील व सामाजिक कार्यकर्ते कैलास भदाणे यांनी याबाबत पुढाकार घेतला. निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दशरथ पाटील, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेश बागुल, सरपंच संजय खैरनार, सामाजिक कार्यकर्ते दौलत जाधव, गणेश देवरे, राजेंद्र जाधव, अनिल जाधव, शिवाजी पाटील, धनराज खलाणे, शानाभाऊ बच्छाव, अरुण देवरे, राजू रामीकर, सतीश बाविस्कर, राजेश शेवाळे, सुनील पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन रूढी-परंपरांना फाटा देत साखरपुड्यातच हा विवाह सोहळा हिंदू विवाह पध्दतीने संपन्न झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT