उत्तर महाराष्ट्र

दिवाळीच्या खरेदीसाठी "ऑनलाइन'ची थैली 

अमोल भट

जळगाव : दिवाळी म्हणजे आनंदाचा, समृद्धीचा सण... विविध प्रकारच्या फराळाबरोबर घरातील सर्वांसाठी कपड्यांची खरेदी आवर्जून केली जाते. दिवाळीनिमित्त सज्ज झालेल्या बाजारपेठेसह घरबसल्या जास्तीत जास्त सवलतींचा लाभ घेत खरेदीचा पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध आहे. त्यामुळे ऍण्ड्रॉईड मोबाईलमुळे ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे चित्र आहे. 

बाजार फुलायला लागल्यावर दिवाळीची चाहूल लागते. एरवी वर्षभर शॉपिंग चालूच असते, तरीही दिवाळीची खरेदी विशेष असते. दिवाळीची मजा खरेदीशिवाय अपुरी आहे, असेही मानले जाते. 

"ऑनलाइन' खरेदीचा पर्याय 
शहरात दिवाळीचा उत्साह जाणवू लागला आहे. केवळ आठ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. आकाशदिवे, फटाक्‍यांचे स्टॉल सजू लागले आहेत. कपडे खरेदीसाठी शहरातील दुकानांमध्ये ग्राहकांची पावले वळू लागली असली तरी या खरेदीला ऑनलाइन खरेदीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

कंपन्यांच्या आकर्षक सवलती 
अनेक कंपन्यांनी ग्राहकांना ऑनलाइन खरेदीसाठी आकर्षित करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. एका वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत, 50 ते 75 टक्के किमतीपर्यंत सवलत यासारख्या अनेक योजना या कंपन्यांनी आणल्या आहेत. ऍण्ड्रॉईड मोबाईलवर या कंपन्यांनी आपली ऍप्स तयार केल्याने इंटरनेटवरच खरेदीचे प्रमाण वाढले आहे. 

मौल्यवान वस्तूंचीही खरेदी 
ऑनलाइन खरेदीमध्ये कपड्यांपासून सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध असल्याने या कंपन्यांमार्फत खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. अगदी 40 ते 50 हजारांपर्यंतच्या वस्तूदेखील या माध्यमातून विकत घेतल्या जात आहेत. इंटरनेटवरून होणाऱ्या खरेदीमध्ये कपड्यांबरोबरच सर्वाधिक विक्री आहे ती मोबाईल आणि अन्य इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या साहित्याची. 

"कॅश ऑन..'चा पर्याय चांगला 
सुरवातीला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने ही ऑनलाइन खरेदी करावी लागायची. "कॅश ऑन डिलिव्हरी'चा पर्याय सार्वत्रिक नव्हता. आता मात्र बहुतेक सगळ्या शॉपिंग साइट्‌स हा पर्याय देऊ लागल्यानंतर आणि "रिटर्न पॉलिसी'देखील आल्यानंतर "रिस्क नाही' असे म्हणत अनेकजण या खरेदीकडे वळले आहेत. 
 
खरेदी करताना घ्या काळजी 
- ज्या वेबसाइटवरून वस्तू खरेदी कराल, त्या वेबसाईटच्या खाली "वेरी साईन ट्रस्टेड' अशा पद्धतीचे प्रमाणपत्र तपासून पाहा. 
- साइटवर ग्राहकांनी दिलेले "रिमार्क' वाचून खरेदीचा निर्णय घ्या. 
- ज्या कंपनीचे प्रॉडक्‍ट खरेदी करायचे आहे त्याची ऑनलाइन खरेदीसंदर्भातील माहितीचा तपशील तपासा. 
- ऑनलाइन प्रॉडक्‍ट विकणाऱ्या कंपनीची किंवा वेबसाइटची सत्यता तपासून पाहावी. 
- शक्‍यतो "कॅश ऑन डिलिव्हरी'चा पर्यायच निवडावा. 
-खरेदी केलेली वस्तू किंवा पैसे परत मिळत असतील तरच ऑनलाइन खरेदी करा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT