residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

सुरळित मतदानासाठी पोलिसांचा खडा पहारा,  पैसे वाटप, छुप्या प्रचारावर नजर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः विधानसभा निवडणूकीचे मतदान दोन दिवसांवर आल्याने पोलिस यंत्रणा सजग झाली आहे. मतदानापूर्वीच्या 72 तास आधीपासूनच्या कृती आराखड्याचा अंमल शहर-जिल्ह्यात सुरु झाला आहे. 

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, पोलिस अधिक्षक डॉ.आरती सिंह यांनी शहर जिल्ह्यातील निवडणूक तयारीची एकत्रित माहीती दिली. 
जिल्ह्यातील 15 मतदार संघात 45 लाख 44 हजार मतदारांना शांततेत व सुरळित मतदानासाठी 4545 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलासह 40 कंपन्या मागविण्यात आल्या आहेत. दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणी 
करण्यासाठी प्रसंगी ड्रोणचाही वापर केला जाणार आहे. मतदानापूर्वी उमेदवारांकडून पैसे वाटप होण्याची शक्‍यता गृहीत धरुन पोलिसांनी सिडको भागावर विशेष लक्ष केंद्रीत 
केले आहे. 
11 मतदान संघावर लक्ष 
ग्रामीण पोलिसांकडे आर्धा देवळालीसह जिल्ह्यातील साडे 11 मतदार संघातील 3423 मतदान केंद्रावर मतदानाच्या बंदोबस्ताचे नियोजन आहे. त्यात 32 संवेदनशील केंद्र आहेत. बंदोबस्तांसाठी गुजरात राज्यातून बंदोबस्त मागविला आहे. आतापर्यत 7 शस्त्र, 25 हजार लिटर दारु जप्त केली असून 18 जण हद्दपार केले आहेत. आचारसंहिता भंगाचे 24 गुन्हे दाखल आहेत. बंदोबस्तासाठी 11 केंद्रीय पथकाच्या तुकड्या मागविल्या आहेत. 12 उप अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 3200 पोलिस बंदोबस्तासाठी 
तैनात असतील. मोबाईल, इंटरनेटची सुविधा नसलेल्या दुर्गम भागात पोलिसांच्या वायरलेसच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT