shirish chaudhary
shirish chaudhary 
उत्तर महाराष्ट्र

Vidhan sabha 2019 : जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध : शिरीष चौधरी 

योगेश महाजन

 
गेल्या निवडणुकीत 'शेतीला पाणी, हाताला काम' हे ब्रीद घेऊन आम्ही उतरलो. सिंचनासाठी 'न भूतो न भविष्य’ अशी कामे करून हे ब्रीद सत्यात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांचा कौल आपल्याच बाजूने राहील. आगामी काळातही गतिमान विकासातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं, रयत क्रांती संघटना व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आमदार शिरीष चौधरी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

श्री. चौधरी म्हणाले, की अमळगाव (ता. अमळनेर) ही माझी जन्‍मभूमी आहे. त्यामुळे खरा 'भूमिपुत्र' कोण हे जनता ओळखून आहे. अमळनेर ही संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, साने गुरुजींची कर्मभूमी व श्री मंगळग्रह मंदिरामुळे मंगलनगरी आहे. विकास हा एकच ध्यास असल्याने भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारून पाच वर्षांत आपण सर्वांगीण विकास साधण्यात यश मिळविले. या कार्याची पावती म्हणूनच भाजपने या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी देऊन संधी दिली असून, आपण संधीचे सोनं करू. मात्र, काही जण मतदारसंघात जातीपातीचं विष पसरवून मतदारांची दिशाभूल करीत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. 

मतदारसंघात कोट्यवधींची कामे 
जलयुक्‍त शिवारांतर्गत जिल्ह्यातील सर्वाधिक कामे अमळनेर तालुक्यात झाली आहेत. दळणवळणासाठी रस्ते, ग्रामपंचायतीच्या अद्यावत इमारती व हायटेक कारभार, अत्याधुनिक व्यायामशाळा, सामाजिक सभागृहे, विविध धार्मिक स्थळांचे निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांचे पुतळे, पालिकेची अद्यावत प्रशासकीय इमारत, चोपडा रस्त्यावरील स्मशानभूमी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नवीन पोलिस वसाहत, भाजीपाला मार्केट, मटन मार्केट आदी विकासकामांमुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. 

अनेक कामे प्रगतिपथावर 
हायब्रीड अॅन्युटीअंतर्गत नवलनगर ते अमळनेर, म्हसले ते अमळनेरमार्गे बेटावद १९३ कोटींचा रस्ता प्रगतिपथावर आहे. संत सखाराम महाराज भक्‍त निवासाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. मंगळग्रह मंदिराच्या सुशोभीकरणाचे कामही प्रगतिपथावर आहे. शहरात भुयारी गटारीचेही काम सुरू आहे. चोपडा रेल्वेगेटवरील चार पदरी उड्डाणपुलाचे ३८ कोटींचे कामही प्रगतिपथावर आहे. कलाली डोहातून पाणीपुरवठा येाजना मंजूर झाल्याने शहराचा पाणीप्रश्‍न मिटण्यास मदत झाली. 

गतिमान विकासाचे ‘स्मार्ट व्हीजन’ 
आगामी काळात मतदारसंघाच्या गतिमान विकासाचे ‘स्मार्ट व्हीजन’ आम्ही ठेवले आहे. यात महत्त्वाकांक्षी पाडळसे प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्रात व राज्यात पाठपुरावा सुरूच आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५०० कोटी रुपयांच्या कर्ज घेण्याच्या प्रस्तावास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. दोन कामे कमी झाली चालतील, मात्र पाडळसे प्रकल्प पूर्ण करूच. तसेच सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी सुमारे शंभर कोटींची प्रशासकीय इमारत करण्याचा मानस आहे. राष्ट्रमाता जिजाऊ सूतगिरणीला मंजुरी मिळाली असून, या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल. हिरा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र चौधरी, झेप फाउंडेशनच्या माध्यमातून महिला, तरुणींच्या रोजगारासाठी काम करत असलेल्या आमच्या भगिनी रेखाताई चौधरी यांचीही विकासासाठी भक्कम साथ लाभत आहे, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT