live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

गृहोद्योग कारखान्याला मध्यंरात्री आग; कोट्यावधीचे नुकसान 

सकाळवृत्तसेवा

शहादा ः शिरूड चौफुली नजीक सालदारनगर भागात सूर्या गृहोद्योग कारखान्याला रात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत संपूर्ण फॅक्‍टरी जळून खाक झाली आहे. शॉर्टसर्किटने आग लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 
सूर्या फॅन म्हणून येथील उत्पादक प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे इतर फरसाण व नमकीन पॅकिंग साहित्य संपूर्ण राज्यात विक्री केली जात होती. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसून आगीत सुमारे दोन ते कोटी कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास आग आटोक्‍यात आणली. शहादा तळोदा नंदुरबार, नवापूर, दोंडाईचा व सातपुडा साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. फॅक्‍टरीचे मालक मुकेश तवर हे चेन्नई येथे गेले असून आज दुपारपर्यंत शहाद्याला पोहोचतील. तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक संजय शुक्‍ला यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: आरवली उड्डाणपूल मे अखेर होणार सुरु

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT