live
live 
उत्तर महाराष्ट्र

फडणवीस, अजीत पवारांनी बदलले ट्‌विटर हॅंडल.... राजकीय त्सुनामीनंतर सोशल मिडीयावरही पडसाद,

सकाळ वृत्तसेवा

नाशिक: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सोशल मिडीयावरही वातावरण ढवळून निघाले होते. मंगळवारी (ता.26) राजकीय त्सुनामीनंतर सोशल मिडीयावरही पडसाद उमटले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपले सोशल मिडीयावरील अकाऊंटवर दुरूस्ती करत काळजीवाहू मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तर अजित पवार यांनीही पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री असे प्रोफाईलवर नमुद केले. 

मंगळवारी (ता.26) दिवसभर सोशल मिडीयावर राज्यातील राजकारणाबाबतची चर्चा सोशल मिडीयावर सुरू राहिली. ट्विटरवर ट्रेंडीगवर फक्‍त आणि फक्‍त राज्यातील घडामोडीच बघायला मिळाल्या. सायंकाळी उशीरा #MaharashtraPoliticalDram हा हॅशटॅग ट्रेंडीगवर राहिला.

ट्रेंडीगकडेच लक्ष

 या पाठोपाठ सतरा हजारहून अधिक ट्विट असलेला #AjitPawar हा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर #GoodbyeFadanvis हा हॅशटॅक तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंडींग करत होता. तसेच #PawarSoniaSena हा हॅशटॅगदेखील ट्विटरवर ट्रेंडींगला बघायला मिळाला. 


दरम्यान राजकीय घडामोडी घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर आपले ट्‌विटर व फेसबुकवरील प्रोफाईलची माहितीत बदल करत केअरटेकर चीफ मिनिस्टर अर्थात काळजीवाहू मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तर अजित पवार यांनीही माजी उपमुख्यमंत्री असा उल्लेख आपल्या ट्‌विटर अकाऊंटवर केला होता. 

सीएमओ महाराष्ट्र ट्‌विटवर फडणवीस 
मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्‌विटर हॅंडल असलेल्या सीएमओ महाराष्ट्र या ट्‌विटर हॅंडलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाचा उल्लेख होता. तर त्यांचेच छायाचित्र या अकाऊंटवर असल्याचे बघायला मिळाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT