live
live 
उत्तर महाराष्ट्र

स्थायी समिती सभापती पदी उध्दव निमसे बिनविरोध 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक- स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाल्यानंतर शिवसेनेला देखील उमेदवारी माघारी घ्यायला लावून बिनविरोध निवडणुक करण्याचे भाजपचे प्रयत्न आज उध्दव निमसे यांच्या निवडीनंतर सफल झाले. शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी माघार घेतल्यानंतर निमसे सभापती पदावर दुसऱ्यांदा विराजमान झाले. 

स्थायी समितीच्या सोळा सदस्यांपैकी नऊ सदस्य सत्ताधारी भाजपकडे असल्याने सत्ता याच पक्षाकडे येणार हे स्पष्ट होते त्यामुळे सभापती पदासाठी मुंबईत लॉबिंग झाले. गणेश गिते, कमलेश बोडके व स्वाती भामरे यांच्या ऐवजी प्रदेश पातळीवरून उध्दव निमसे यांचा एकमेव अर्ज बुधवारी दाखल झाल्यानंतर निमसे यांच्या निवडीची औपचारीकता बाकी होती. निमसे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजप मध्ये असंतोष होत. त्यामुळे बंडाची देखील भिती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ईगतपुरीच्या मानस हॉटोल मधील एक दिवसाचा मुक्काम संपवून पालिका मुख्यालयात भाजपच्या नऊ सदस्यांची टिम पोहोचेपर्यंत शिवसेनेला देखील माघारी घेण्यासाठी प्रयत्न होते. शिवसेनेला चार पैकी शहर सुधार व विधी समितीचे उपसभापती पद देण्याच्या अटीवर शिवसेनेने स्थायी समिती सभापती पदाच्या शर्यतीतून माघारी घेण्याचा निर्णय घेतला. पिठासन अधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे माघारीचा अर्ज सादर केल्यानंतर उध्दव निमसे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते सतिश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, शिवाजी गांगुर्डे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शिवसेना गटनेते विलास शिंदे आदींनी निमसे यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदर केले. महापौरांच्या रामायण निवासस्थानी ढोलताशांच्या गजरात निवडीचे स्वागत करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT