live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

स्थायी सभापतीपदी हिमगौरी आहेर-आडके,प्रथमच महिला सभापती

सकाळवृत्तसेवा

नाशिक स्थायी समितीत भाजपकडे बहुमत असूनही नाराजी मुळे विचित्र निकाल हाती येण्याच्या भितीने ग्रासलेल्या भाजपचा सभापती पदी हिमगौरी आहेर-आडके यांची निवडीमुळे जीव भांड्यात पडला. प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या संगिता जाधव यांचा तीन मतांनी पराभव झाला. सौ. आडके यांना नऊ तर जाधव यांना सहा मते मिळाली.

चमत्काराच्या आशेवर निवडणुकीचा सामना करणाऱ्या शिवसेनेला मनसेच्या गटातील मुशीर सैय्यद यांच्या गैरहजेरीमुळे उलट भाजपनेचं झटका दिला. 
यंदाच्या पंचवार्षिक मधील स्थायी समितीच्या दुसऱ्या सभापती पदाची निवडणुक भाजपकडे बहुमत असूनही गाजली. सभागृह नेते दिनकर पाटील व माजी स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांची सदस्य पदी निवड झाल्यानंतर सभापती पदाचे दावेदार देखील मानले जात होते.

  ऐनवेळी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून हिमगौरी आडके यांचे नाव पुढे केल्याने भाजप मध्ये नाराजीचे फटाके फुटू लागल्याने भाजपसाठी निवडणुक अवघड बनली. नाराजीचा फायदा उचलण्यासाठी शिवसेनेने पावले उचलल्याने भाजप मधील अस्वस्थता अधिकचं वाढली. बहुमत असूनही सुरक्षिततेचा उपाय म्हणून एक दिवसासाठी स्थायी सदस्यांना मुंबई वारी करण्यात आली. आज सकाळी दहा वाजता महापौरांच्या निवासस्थानावर सदस्य खासगी वाहनाने दाखल झाले. सकाळी अकरा वाजता निवडणुक प्रक्रिया सुरु असताना प्रथम भाजपचेचं सर्व सदस्य हजर होते.

 विरोधी गटातील सहा सदस्य हजर झाले. निवडणुक निर्णय अधिकारी ज्योतिबा पाटील यांनी माघारीची मुदत दिली त्यादरम्यान माघारी न घेतल्याने निवडणुक अटळ ठरली. हिमगौरी आडके यांच्या बाजून नऊ मते पडली तर जाधव यांच्या बाजूने त्यांच्यासह शिवसेनेचे प्रविण तिदमे, भागवत आरोटे, संतोष साळवे, कॉंग्रेसचे समीर कांबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुषमा पगारे या सहा सदस्यांनी मतदान केले. आडके यांना नऊ मते मिळाल्याने त्यांना सभापती म्हणून घोषित करण्यात आले. 

मुशीर सय्यद अनुपस्थित 
मनसेच्या गटातून स्थायी समितीवर गेलेल्या अपक्ष मुशीर सैय्यद यांनी मनेसचा व्हीप नाकारून गैरहजर राहिल्याने भाजपला मदत केली. यापुर्वी मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी महापौरांकडे सैय्यद यांचा राजीनामा सादर केला होता त्यावेळी सैय्यद यांनी राजीनामा मंजुर करू नये असे पत्र दिल्याने त्याचवेळी भाजपने त्यांना गळाला लावल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. मनसेने शिवसेनेला मदत करण्याचा व्हीप बजावला होता. भाजपकडे नऊ मते असताना देखील सैय्यद यांना आपल्या बाजूने ओढतं पक्षाच्या नाराज नगरसेवकांच्या भुमिकेला देखील चाप लावला. 

पहिल्या महिला सभापती 
महापालिकेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत स्थायी समिती सभापती पदावर एकदाही महिलेला संधी मिळाली नव्हती. यंदा प्रथमचं हिमगौरी आडके यांच्या रुपाने महिला सभापती झाल्या आहेत. यापुर्वी सन 1997-98 मध्ये बाळासाहेब आहेर स्थायी समितीचे सभापती होते. वडलानंतर आता मुलगी हिमगौरी यांना सभापती पदाचा मान मिळाला आहे. सन 2002 मध्ये त्यांच्या आई शोभना आहेर या उपमहापौर राहिल्या आहेत. 

नव्या सभापती हिमगौरी आहेर-आडके म्हणाल्या, माजी मंत्री दिवंगत डॉ. दौलतराव आहेर यांच्या पासून आहेर कुटूंबाचे नाशिकच्या विकासात योगदान राहिले आहे. त्यांच्या आशिर्वादाने मला सभापती पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. विकासाची परंपरा कायम 
ठेवेन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT