live
live 
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये गुरुवारी गोदा-कादवा ऊस, कांदा, द्राक्ष परिषद,आरपार लढाईचा इशारा 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : शासनाचे शेतीमालासंदर्भातील चुकीच्या निर्यात धोरणांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडीत निघाले आहे. त्यामुळे येत्या 27 तारखेला करंजगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथे होऊ घातलेल्या गोदा-कादवा ऊस, कांदा, द्राक्ष परिषदेतून शासनालाच आरपारच्या लढाईचा इशाराच शेतकरी देणार असल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
... 
करंजगाव (ता.निफाड) येथे येत्या गुरूवारी (ता.27) सायंकाळी 6 वाजता स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोदा-कादवा ऊस, कांदा, द्राक्ष परिषद होत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संघटनेच्या माध्यमातून गावोगावी शेतकऱ्यांच्या सभा घेतल्या जात असल्याचे सांगत, श्री. वडघुले म्हणाले की, शासनाने उद्योजकांचे 2 लाख 40 हजार कोटींचे कर्जमाफ केले असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले.

शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्या पतपुरवठ्याअभावी मोडकळीस आणल्या आहेत. त्यामुळे या सोसायट्यांना तातडीने नाबार्डमार्फत कर्जपुरवठा उपलब्द करून द्यावा. कांद्याचे भाव पुन्हा पडले असून त्यासाठी ठोस निर्यातधोरण आणि स्वतंत्र महामंडळाची आवश्‍यकता आहे. रानवडबाबत अद्यापही निविदा न निघाल्याने कारखाना यंदा सुरू होण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे निफाड तालुक्‍यातील ऊसउत्पादक अडचणीत आले आहेत.

गेल्या काही वर्षांतील जिल्ह्यातील साखर कारखाने बंद पडत असल्याने परजिल्ह्यात ऊस विकावा लागतो. परंतु त्यामुळे अद्यापही काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसाचे क्षेत्र मोठयाप्रमाणात घटले आहे. तसेच, भाजीपाला क्षेत्र वाढल्याने आता त्यांचेही भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातून पुन्हा कर्जबाजारी होऊन त्याच्यावर आत्महत्त्येची वेळ येऊ घातली आहे. त्यामुळे या परिषदेमध्ये शेतकऱ्यांमार्फत संघटना शासनाला आरमारच्या लढाईचा इशाराच देणार असल्याचे श्री. वडघुले यांनी स्पष्ट केले. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते संदीप जगताप, प्रांतिक सदस्य साहेबराव मोरे, उत्तर महाराष्ट्र सचिव सोमनाथ बोराडे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, नाना बच्छाव, नितीन रोटे-पाटील, भाऊसाहेब तासकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT