उत्तर महाराष्ट्र

वृद्धाचा असा ही आदर्श..एका पायावर ३ डोंगर सर करून लस घेतली

सम्राट महाजन

तळोदा : आपल्या गावात इतकेच काय घराशेजारीच लसीकरण (vaccination) होत असतानाही असंख्य नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. अशा परिस्थितीत सातपुड्याच्या (satpuda) अतिदुर्गम भागातील (Tribal remote areas) मोकसमाळ येथील ७५ वर्षीय राज्या पावरा यांनी अपंग असताना, चक्क एका पायावर ३ डोंगर चढून - उतरुन लसीकरणाच्या ठिकाणी पोहचत लस घेतली आहे. यामुळे पावरा यांची ही कृती लस घेण्याबद्दल उदासीन असणाऱ्यांसमोर नक्कीच आदर्श निर्माण करणार आहे.


( remote areas crippled old man climbing three hills corona vaccinated)

तळोद्याच्या दुर्गम भागात विशेषतः सातपुड्याच्या भागात लसीकरणाची (corona vaccination) टक्केवारी कमी आहे. त्यामुळे या भागांमध्ये टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आरोग्य विभागासोबतच (Health Department) ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना हळूहळू का होईना पण आता यश मिळताना दिसत आहे. अतिदुर्गम भागातील मोठीबारी (ता. तळोदा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शनिवारी (ता.२९) मोठीबारी व आसपासच्या परिसरातील पाड्यांवरील नागरिकांचे लसीकरण झाले. त्यासाठी शिक्षकांनी या परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली, त्यामुळे कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळाला.

आश्चर्याचा सुखद धक्का..

मोकसमाळ हे अतिदुर्गम भागात येत असून तेथून मोठीबारी जाण्यासाठी पायी जावे लागते, दरम्यान वाटेत दोन - तीन डोंगर येतात. राज्या पाडवी यांनी चक्क एका पायाने ते डोंगर चढून - उतरुन, ३ की. मी. चे अंतर कापत लस घेण्याची सकारात्मकता दाखवली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. दरम्यान मोठीबारी येथील वयोवृद्धध बामण्या पाडवी व देवला राहसे यांनीही यावेळी लस घेतली. यावेळी मोठीबारी येथील १६, मोकसमाळ - बोडवाल येथील १३ व चिनीपाणी येथील ४ अशा एकूण ३३ नागरिकांचे लसीकरण झाले. यासाठी डॉ. जे. टी. वळवी, श्री. एन. एस. तुपे, परिचारिका गावित, ग्रामसेविका रत्ना धनगर तसेच केंद्रप्रमुख रंजना निकुंभ, पदम माळचे, विजय कोळी, माधव वळवी, शिवाजी ठाकरे, बादल वसावे, जितेंद्र कोळी, हरिशचंद्र भोये, किरण खैरनार, गिंबा राहसे, सोन्या पाडवी, नितिन शिंपी आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले.


नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत असलेली भीती, गैरसमज शिक्षकांनी आसपासच्या परिसरात फिरत दूर केले. मी कालच लस घेतली, सर्व नागरिकांनी लस घेवून शासन - प्रशासनाला सहकार्य करावे.
- राज्या पाडवी
ग्रामस्थ, मोकसमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

SCROLL FOR NEXT