live
live 
उत्तर महाराष्ट्र

वड, पिंपळाची झाडे तोडून तपोवनात फटाक्‍याचे गाळे 

सकाळवृत्तसेवा

पंचवटी ः वाढत्या पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम सर्व भोगत आहे. राज्यस्तरावर अवघी दीड ते दोन टक्के वनसंपत्ती शिल्लक राहिल्याने खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणेकडून एकीकडे वृक्ष लागवडीसाठी एकीकडे कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे. मात्र असे असतानाच दुसरीकडे यंत्रणेच्या नाकावर टिच्चून वड, पिंपळ, कडुनिंब अशी देशी झाडे फक्त फटाक्‍यांच्या पाचदहा दिवसांच्या स्टॉल्ससाठी तोडण्यात आल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार आज सकाळी तपोवन परिसरात उघड झाल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कडक कारवाईचा आग्रह धरला आहे. 

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे गोल्फ क्‍लब मैदानासह शहराच्या विविध भागात फटाक्‍यांच्या गाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. तपोवनात गत सिंहस्थात विकसित करण्यात आलेल्या प्रवेशद्वारालगतही फटाक्‍यांचे 14 गाळे लावण्यात आले आहे. मात्र हे गाळे लावताना त्याठिकाणी आठ ते दहा फुटांपेक्षाही जास्त वाढ झालेले वड, पिंपळ, कडुनिंब अशी देशी झाडे अतिशय निर्दयपणे गाळ्यांच्या मागील बाजूला फेकून देण्यात आलेली आढळून आली.

एकेकाळी विपूल वनसंपत्ती असलेल्या महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भासह अवघी दीड ते दोन टक्के वनसंपदा शिल्लक राहिल्याचा परिणाम सर्वजण भोगत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून वृक्षलागवडीवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करून हा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षलावडीचे आवाहन केले जाते. मात्र तपोवनासारख्या ठिकाणी लावण्यात आलेले व बऱ्यापैकी वाढ झालेले पंधरा ते वीस वृक्ष अक्षरशः तोडून फेकून देण्यात आले व त्यावर फटाक्‍याचे गाळे उभारण्यात आले आहे. अर्थात दोन दुकानांच्या मधे आलेल्या काही झाडांना जीवदान मिळाले असलीतरी दहा ते पंधरा फूट वाढ झालेल्या दहा ते पंधरा फुट वाढ झालेले अनेक वृक्ष मुळासकट तोडून फेकून देण्यात आले आहे. 

उद्यान निरीक्षक अनभिज्ञ 
चांगल्यापैकी वाढ झालेल्या 8 ते 10 झाडांच्या कत्तलीबाबत पर्यावरणप्रेमींसह तपोवनात सकाळी फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होऊनही पंचवटी विभागाचे उद्यान निरीक्षकांना याप्रकरणी विचारणा केली असता ते वृक्षतोडीबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT