residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

आवक घटल्याने आठवडे बाजारात भाज्यांचे दर तेजीत 

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी ः गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या आवकेनंतरही आज बुधवारच्या आठवडे बाजारात फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर तेजीतच राहिले.

कोथिंबींरीच्या अवघ्या चार सहा काड्यांसाठी पंधरा ते वीस रूपये तर चांगल्या दर्जाच्या मेथीच्या जुडीसाठी चाळीस ते पन्नास रूपये मोजावे लागल्याने काही प्रमाणात गृहिणींचे अर्थकारणही बिघडल्याचे चित्र होते. 

गोदावरीच्या दुतर्फा दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. याठिकाणी धान्यासह पालेभाज्या व तत्सम गृहोपयोगी वस्तू उपलब्ध होत असल्याने मोठी गर्दी उसळते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आवक होऊनही फळभाज्यांसह पालेभाज्यांचे दर तेजीतच राहिले. 
बाजारात कमी संख्येने आवक झालेल्या मेथीची जुडी 40 ते 50 पन्नास रूपयांत उपलब्ध होती तर अल्प प्रमाणात आलेल्या कोथिंबीरीनेही भाव खाल्याचे दिसून येते. कोथिंबीरीच्या मोठ्या जुडीसाठी पन्नास ते साठ रूपये दर पाच सहा काड्यांच्या छोट्या जुडीसाठी पंधरा ते वीस रूपये मोजावे लागत होते. गेल्या काही दिवसांपासून खालवलेली पाणी पातळी व तीव्र उन्हामुळे बाजार समितीतही कोथिंबीरीची आवक मर्यादित राहिल्याने आठवडे बाजारातही भाव तेजीतच राहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT