उत्तर महाराष्ट्र

जिल्ह्यात 14 ईव्हीएम, 64 व्हीव्हीपॅट बंद 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी 14 ईव्हीएम मशिन, 14 कंट्रोल युनिट, तर 66 ठिकाणी व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने काही वेळ मतदान बंद पडले होते. लागलीच रिझर्व्ह असलेले ईव्हीएम मशिन, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशिन बदलविण्यात आले आहेत. बंद पडलेल्या काळात मतदान केंद्रावर फारशी गर्दी नसल्याने मतदारांना अधिक वेळ वाट पहावी लागली नसल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी "सकाळ'ला दिली. 
सर्वांत अगोदर रावेर मतदार संघात काही मशिन बंद पडल्याच्या घटना घडल्या. नंतर तांत्रिक अडचणीमुळे मशिन बंद झाल्याचे प्रकार घडले. मात्र लागलीच ईव्हीएम मशिन, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट मशिन बदलून देण्यात आले आहेत. 

दुपारी एकपर्यंत 28 टक्के 
जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत 28 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. सकाळी नऊपर्यत केवळ 5 टक्के तर अकरापर्यंत 14.58 टक्के मतदान झाले होते. दूपारनंतर पावसाने चांगली उघडीप दिल्याने मतदानाची टक्केवारी 60 टक्‍क्‍यांपर्यंत पोचेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT