rent
rent 
उत्तर महाराष्ट्र

सहा टक्के पाणी वाचविण्यात प्रशासनाला यश 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : यंदाच्या पावसाळ्यात शंभर टक्के धरण भरल्याच्या नावाखाली टॅकर सुरु करण्यासाठी हात आखडता घेण्यासह पाण्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने विविध क्‍लुप्त्या वापरीत गतवर्षाच्या तुलनेत साधारण सहा टक्के पाणी वाचविण्यात यश मिळविले आहे. मात्र आता उन्हाच्या कडाक्‍यासोबत पाण्याच्या मागणीची धार वाढू लागली आहे. प्रत्येक धरणातील किमान दोन ते तीन आरक्षण बाकी असल्याने प्रशासकीय स्तरावर पाणी आवर्तनाची तयारी सुरु झाली आहे. 

नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी मुसळधार पाउस झाला. सुमारे सव्वाशे टक्के पाउस झाल्याने खालील धरणाना पाणी सोडल्यानंतरही जिल्ह्यातील सगळ्या प्रमुख धरणाची पाणी पातळी चांगली होती. गंगापूर समूहातील सगळी धरणे शंभर टक्केवर भरली होती. जिल्हा प्रशासनानेही नेमक्‍या या मुसळधार पर्जन्यवृष्ट्रीचा चांगलाच गाजावाजा करीत, जिल्हा प्रशासनाने फेब्रूवारी संपल्यानंतरही पाण्याचे टॅकरपासून तर पाणी सोडण्यापर्यतच्या विविध भागातील मागण्यांकडे दुर्लक्ष केले. भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या अहवालानुसार 
पाण्याच्या पातळी घटल्यानंतर आणि दिडेक महिणाभर गावोगावच्या शिष्टमंडळाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाण्यासाठी चकरा सुरु असूनही प्रशासनाकडून अजिबात प्रतिसाद दिला गेला नाही. 

सहा टक्के पाणी बचत 
फेब्रूवारी संपेपर्यत जिल्ह्यातील शंभर टक्के पावसाचे तुणतुणे वाजविणाऱ्या प्रशासनाने शेवटी शेवटी तर येवल्यासह काही गावातील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीना गावबंदीचे इशारे दिल्यानंतरही पाण्याच्या मागण्याची दखल सुध्दा घेतली नाही. नाशिक मधील पाण्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेमुळे म्हणा की पाणी कजुंषीने पाणी सोडण्याच्या भूमिकेमुळे म्हणा पण यंदाच्या उन्हाळ्यात गत वर्षाच्या तुलनेत तब्बल 6 टक्के पाणी आधीक आहे. दोन वर्षापूर्वी नाशिकला अशीच शंभर टक्के धरणे भरली होती. मात्र गतवर्षी मार्चच्या मध्याला फक्त 40 टक्केच पाणी होते. यंदा मात्र 46 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील धरणात साधारण 6 टक्के पाणी शिल्लक आहे. यात दोन वर्षातील वाढलेला गाळ बाष्पीभवनासह इतर बाबी लक्षात घेतल्या तरी, पाच टक्के तरी पाणी वापरता येणे शक्‍य होणार आहे. 

आर्वतनाच्या मागण्या 
आर्धा महिणा संपत आल्याने जिल्हाभरातील विविध भागातून पिण्याच्या सिंचनाच्या आवर्तनाचा आग्रह सुरु झाला आहे. चणकापूर धरणातून 4 आवर्तन दिली जातात. अद्याप 
तीन आवर्तन बाकी आहे. आळंदी धरणातून डाव्या कालव्यातून दोन आवर्तन बाकी आहे.गंगापूर धरणातील सिंचन आणि बिगर सिंचनाचे आवर्तन बाकी आहे. एकलहरे वीज निर्मिती प्रकल्पासह दिक्षी, दात्याने, थेरगावसह विविध गावांचे साधारण 45 दशलक्ष घनफूटाचे पाणी सोडणे बाकी आहे. पालखेड धरणाचे रविवारीच पहिले आवर्तन संपले. 
  एप्रिल व मेच्या अखेरच्या असे 2 आवर्तन बाकी आहे. हरणबारी धरणातून 1 केळझर 1, पूनद मधून सटाणा व इतर भागासाठीचे मे व महिण्यात आवर्तन बाकी आहे. अशा विविध धरणातील पाण्याच्या आवर्तनासाठी आतापासून मागणी सुरु झाली आहे. 

प्रमुख धरण समूह साठा (द.ल.घ.फू) टक्के 
गंगापूर धरण समूह 6767 66 
पालखेड समूह 3289 40 
दारणा 9983 53 
गिरणा समूह 7330 32 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT