residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

मुक्‍त विद्यापीठात 7 डिसेंबरपासून इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठ स्पर्धा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्या प्रांगणात येत्या 7 ते 11 डिसेंबरदरम्यान इंद्रधनुष्य ही आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत विविध राज्यांतील वीस विद्यापीठांतील आठशेहून अधिक स्पर्धक आपापल्या कलांचे सादरीकरण करतील. मुक्‍त विद्यापीठात स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. 

गेल्या वर्षी नोव्हेंबर 2017 मध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ही स्पर्धा झाली. यंदा स्पर्धा आयोजनाचा मान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाला मिळाला. स्पर्धेच्या तयारीच्या आढाव्यासाठी सोमवारी (ता. 26) स्पर्धा समन्वयकांची बैठक विद्यापीठात होणार आहे. याअंतर्गत समन्वयकांच्या सूचना नोंदवत त्यादृष्टीने पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यापूर्वी विद्यापीठ स्तरावर झालेल्या स्पर्धांतून निवड झालेले स्पर्धक त्या-त्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व इंद्रधनुष्य स्पर्धेत करणार आहेत. सांस्कृतिक स्पर्धेत एकपात्री प्रयोग, संगीत, कोलाज, स्पॉट पेंटिंग, पथनाट्य, गायन, सुगम संगीत आदी वेगवेगळ्या गटांत सादर होतील. 

या विद्यापीठांचा सहभाग 
यजमान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठासह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक), मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ (मुंबई), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (नागपूर), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा (औरंगाबाद), शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), संत गाडगेबाबा विद्यापीठ (अमरावती), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (नागपूर), सोलापूर, गडचिरोलीतील विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली), महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ. 


ऑनलाइन नोंदणीची प्रथमच सुविधा 
यापूर्वीपर्यंत आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी नोंदणीची प्रक्रिया ऑफलाइन स्वरूपात होती. यंदा प्रथमच मुक्‍त विद्यापीठातर्फे ऑनलाइन स्वरूपात स्पर्धकांना नोंदणीची प्रक्रिया उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर इंद्रधनुष्य स्पर्धेतील सहभागासाठीचा पर्याय उपलब्ध केला आहे. तसेच संकेतस्थळावर गेल्या स्पर्धांतील छायाचित्रे, विजेत्यांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. नोंदणीसाठी www.ycmou.ac.in संकेतस्थळाला भेट देता येईल. 


मुक्‍त विद्यापीठात होत असलेल्या इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी प्रथमच ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे. स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून, आठशे स्पर्धकांसह एकूण अकराशे व्यक्‍तींच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. 
-डॉ. दिनेश भोंडे, कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT