Mayor Pratibha Choudhary ordered to file case against illegal cafes doing unauthorized trespassing and illegal business dhule news
Mayor Pratibha Choudhary ordered to file case against illegal cafes doing unauthorized trespassing and illegal business dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कॅफेचालकांवर गुन्हा दाखल करा : महापौर चौधरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील युवक- युवतींच्या आयुष्याची नासाडी करणाऱ्या अनधिकृत, अतिक्रमित, अवैध व्यवसाय करणाऱ्या नियमबाह्य कॅफेवर (Cafe) गुन्हा दाखल करावा, असा आदेश महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी दिला. (Mayor Pratibha Choudhary ordered to file case against illegal cafes doing unauthorized trespassing and illegal business dhule news)

त्यामुळे या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गैरप्रकारांमुळे सहायक पोलिस अधीक्षक ह्रषीकेश रेड्डी यांच्यासह पथकानेही नुकतीच कॅफेंवर उचित कारवाई केली होती.

शहरातील अनधिकृत कॅफे आणि त्यातील अवैध व्यवसायांसंदर्भात महापौर चौधरी यांनी सोमवारी (ता. १०) महापौर दालनात संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, कनिष्ठ अभियंता प्रकाश सोनवणे, मोहनीश पाटील, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अश्‍लिल प्रकारांना चालना

जयहिंद कॉलनी, इंदिरा गार्डन, वाडीभोकर रोड यासह देवपूर आणि ठिकठिकाणी असलेल्या कॅफेंमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. यात महाविद्यालयीन युवक- युवतींना व्यसनाधीनतेकडे नेत, तसेच अश्‍लिल प्रकारांना चालना देत त्यांचे आयुष्य बरबाद करणारे अवैध कॅफे शहरात व प्रामुख्याने देवपूर भागात नियमबाहय पध्दतीने सुरू झाले आहेत. त्यामुळे सभ्य संस्कृतीला गोलबोट लागत असून अनेक युवती वाममार्गांला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अतिक्रमण हटवावे

या पार्श्‍वभूमीवर झालेल्या बैठकीत महापौर चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जयहिंद कॉलनी व देवपूर परिसरातील ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामातून कॅफे सुरू करण्यात आले आहेत, मंजूर बांधकाम आराखड्या व्यतरिक्त पार्किंग व पॅसेजच्या जागेत पार्टीशन करून अवैधरित्या बांधकाम केले असेल तर त्याबाबत तत्काळ पाहणी करावी, त्या संबंधित प्लॉटधारकांना नगररचना अधिनियमानुसार नोटीसा बजावून अनधिकृत बांधकामे निष्कासित करावे, तसेच संबंधित प्लॉटधारकांवर गुन्हा दाखल करावा, या कारवाईतील खर्च संबंधित कॅफे, प्लाटधारकांकडून वसुल करावा, यासंदर्भात पोलिस प्रशासनाला मनपा प्रशासनाने पत्राव्दारे अवगत करावे, असा आदेश महापौर चौधरी यांनी बैठकीत दिला.

यंत्रणेला सक्त सूचना

यापूर्वी महापालिकेमार्फत देवपूरमध्ये सोना सुपर शॉपसमोरील कॅफे, माहेर हॉस्पिटलसमोरील कॅफे, चिरंतन हॉस्पिटलसमोरील विकी कॅफे, आयआयटी कॉलेजसमोरील कॅफेवर उचित कार्यवाही करण्यात आली आहे.

तसेच श्री शनीमंदिराजवळील गटारीच्या कामात अडथळा येणारे अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण विभागप्रमुखांना निर्देश देण्यात आले आहेत. अशा सर्व गंभीर स्वरूपाच्या प्रकारांबाबत युध्दपातळीवर कारवाई आणि कार्यवाही करावी, त्याचा अहवाल तत्काळ सादर करावा, अशी तंबीही महापौर चौधरी यांनी यंत्रणेला दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action: ग्राहक चिंतेत! येस बँक आणि ICICI बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

Latest Marathi Live News Update : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबलचक लांब रांगा

Shahid Kapoor And Mira Rajput: शाहिद अन् मिरानं वरळीत घेतलं आलिशान घर; किंमत माहितीये?

Rafael Nadal French Open 2024 : लाल मातीचा बादशहा नदाल पहिल्या फेरीत बाहेर

Rahul Gandhi: सावरकरांची बदनामी प्रकरण; पुणे पोलिसांनी कोर्टाला असं काय सांगितले? ज्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT