उत्तर महाराष्ट्र

सटाणा मर्चंट्स बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ

सकाळवृत्तसेवा

सटाणा : येथील सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेच्या आज शनिवारी (ता.22) रोजी झालेल्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी संचालकांशी काही सभासदांनी अरेरावी करीत आक्रमक भूमिका घेतल्याने एकूणच सभा गोंधळातच पार डली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अलई होते. 

सभा सुरू होताच मागील वर्षीच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्ताचे वाचन सुरु असतांना शाब्दिक चकमकीत गोंधळ सुरु झाला. ध्वनिक्षेपकाची ओढाताण करीत एकावेळेस तीन ते चार सभासद ध्वनिक्षेपकावर बोलू लागले. काही सभासदांनी तर शिवराळ भाषेत संचालक मंडळाचा पानउतारा करीत अवेहलना केली. या गोंधळातच काही सभासदांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. व्यासपीठावर बसलेल्या काही संचालकांशी धक्काबुक्की केली. त्यामुळे महिला संचालक भेदरल्या अवस्थेत व्यासपिठाखाली उतरल्या होत्या. अखेर काही जेष्ठ सभासदांनी धुडगूस घालणाऱ्या सभासदांना शांततेचे आवाहन केल्यानंतर सभा पुर्ववत सुरु झाली.

सभेत 2017-18 वर्षातील ताळेबंद, नफा तोटा पत्रक, अहवाल सालातील नफा वाटणी, सभासदांना भेट वस्तूंचे वाटप करणे या ठरावास सभासदांनी मंजुरी दिली. अहवाल काळात ज्या हिशोब तपासणीची संचालक मंडळास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्या हिशोब तपासणीसाची पुन्हा नेमणूक करू नये असा ठराव करण्यात आला. ज्या सभासदांनी 'केवायसी' पूर्तता केलेली नाही त्यांनी 60 दिवसांच्या आत पुर्तता करावी असे निर्देश संचालक मंडळाच्या वतीने जेष्ठ संचालक रमेश देवरे यांनी दिले. अध्यक्ष राजेंद्र अलई, संचालक यशवंत अमृतकर, रुपाली कोठावदे, कैलास येवला यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

व्यासपिठावर उपाध्यक्ष कल्पना येवला, संचालक पंकज ततार, प्रवीण येवला, शरद सोनवणे, किशोर गहिवड, जयवंत येवला, दिलीप येवला, अशोक निकम, दिलीप चव्हाण, प्रकाश सोनग्रा, जगदीश मुंडावरे, विठ्ठल येवलकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत  जेष्ठ सभासद आण्णासाहेब सोनवणे, पंडितराव सोनवणे, बिंदू शर्मा, मनोहर देवरे, अरविंद सोनवणे, बाळासाहेब बिरारी, संजय सोनवणे, रत्नाकर सोनवणे, बाळू भांगडिया जिभाऊ सोनवणे आदींनी भाग घेतला.बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा येवला यांनी प्रास्ताविक केले. भरत पवार यांनी इतिवृताचे वाचन केले. सभेत लालचंद सोनवणे, गोकुळ सोनवणे, पंकज सोनवणे, श्रीधर कोठावदे, स्वप्नील बागड, यांचेसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT