yeola
yeola 
उत्तर महाराष्ट्र

येवल्यात दोनशेवर बचत गटाने गुंडाळला गाशा

सकाळवृत्तसेवा

येवला - गावोगावी बचत गटांनी क्रांती करून अनेक महिला व पुरुषांना हक्काचा रोजगार दिला आहे.यामुळे तालुक्यात आजही दीडशेवर गट सक्रियपणे कामकाज करून आपापल्या व्यवसायात लाखोंची उलाढाल करत आहे. याचवेळी मात्र दोनशेवर गट मोडकळीला येत आपला गाशा गुंडाळून बसले आहे.

बचत गटांची बांधणी,वाढीसाठी तालुक्याला नव्याने चार अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम मिळाल्याने पुन्हा एकदा जोमाने काम सुरू झाले आहे.सद्यस्थितीत वर्धिनी टीम तालुक्यातील मुखेड,सावरगाव व उंदिरवाडी या ठिकाणी पंधरा दिवस राहून आढावा घेत आहे.लोकसंख्येनुसार येथे दहा ते पंधरा गट स्थापनेचे टार्गेट आहे.याशिवाय गावोगावच्या सक्रिय बचत गटांना देखील प्रत्येकी नव्याने दहा महिलांचे नवीन गट स्थापनेचे बंधनकारक केल्याने त्याही गटस्थापन करून महिलांना या प्रवाहात आणले आहे.

तालुक्यात ३६२ बचत गट होते परंतु गेले दोन वर्ष येथे पूर्णवेळ अधिकारी नसल्याने व ऑनलाइन नोंदणी सक्तीची केल्याने यातील कागदोपत्री चालणारे सुमारे दोनशे गट आपोआप गळून पडले.यातच गटांना निकषांचे अडथळे व बँका देखील सहकार्याची भूमिका घेत नसल्याने अनेक गट बांधले पण पुढे ते उभे राहिलेच नाही. त्यातच काहींनी कर्ज घेतले पण व्यवसाय उभा केला नाही असेही चित्र आहे.प्रशासनाचे अपुरे मनुष्यबळ,मार्गदर्शनाच्या अभावाने देखील अनेक गट मोडून पडले आहेत.आता नव्याने यंत्रणा उभी राहिली असून तालुका समन्वयिका दीपिका जैन व इतर चौघे पूर्णवेळ हेच काम करत आहेत.तसेच कामकाजाची स्वरूपही व्यापक केल्याने यापुढील काळात तरी गट टिकतील व वाढतील ही अपेक्षा आहे.

“गेले दोन वर्ष पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने कर्जासह इतर अडचणीमुळे अनेक गट विखुरले गेले आहेत.वर्धिनीच्या माध्यमातून बचत गट चळवळ पुन्हा जोमाने वाढतेय.मी स्वत पुढाकार घेऊन वर्धिनी व अंगणवाडी महिलांचा मेळ घालून या कामाला व्यापक करण्याच्या सूचना केल्या आहेत.महिनाभरात यामुळे गावोगावी बैठका,मेळावे,सभा व गट बांधणीने वेग घेतला आहे.”
सुनील आहिरे,गटविकास अधिकारी,येवला

“आम्ही स्वतः सक्रियपणे काम केल्याने ममदापूर,राजापूर,भारम व पूर्व भागात पन्नासवर गट व्यवसाय करताय.नव्याने देखील गट स्थापन होत असून मी स्वतः दहा गट तयार केले आहेत व त्याचे काम सुरु आहे.”
-सुनीता बैरागी,समन्वयक,जय योगेश्वर बचत गट,ममदापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT