नव्या बांधणीची बस
नव्या बांधणीची बस 
उत्तर महाराष्ट्र

महामंडळाच्या ६७ बस भंगारमध्ये!

सकाळवृत्तसेवा

जळगाव - राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे आयुर्मान नऊ वर्षाचे करण्यात आले असून, जळगाव विभागांतर्गत प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी सुमारे ८५५ बसची व्यवस्था आहे. या सर्वच बसची दुरुस्ती करण्यात आले असून, आयुर्मान संपलेल्या विभागातील ६७ बस भंगारमध्ये काढण्यात आल्या आहेत. आणि नव्या बांधणीच्या २५ बस दाखल झाल्या असल्याने प्रवाशांना चांगला आरामदायी प्रवास करता येत असल्याचा दावा विभागाकडून करण्यात येत आहे.

खडतर मार्गांवरून धावणाऱ्या ‘एसटी’चा प्रवाशांना मोठा आधार होता. आता खासगी प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाला स्पर्धा निर्माण झाल्याने यात टिकून प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा करण्यासाठी ‘एसटी’ देखील तत्पर झाली. यामुळेच जुन्या बांधणीतील बस आता कालबाह्य होऊ लागल्या असून, स्पर्धेशी सामना करीत परिवहन सेवा चालू ठेवण्यासाठी बसच्या रंगाची शेड बदलून त्यांना नवा लुक देणे, जुन्या बस बदलून नव्या बस आणत असताना ‘टू बाय टू’ परिवर्तन बस आल्या. आता तर परिपूर्ण लक्‍झरी असलेली शिवशाही आली. तसेच लालपरी म्हणून ओळखली जाणारी एमएस बॉडी (स्टील बॉडी) सेमी लक्‍झरी बस महामंडळात दाखल झाली आहे. जळगाव विभागात नवीन बस दाखल होत असताना आयुर्मान संपलेल्या ६७ बस भंगारमध्ये काढण्यात आल्या आहेत. पण अन्य बसची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘एमएस बॉडी’च्या २५ बस
परिवहन महामंडळाने बस बांधणीत मोठा बदल केला आहे. सुरवातीला साध्या लालपरी बस ऐवजी ‘टू बाय टू’च्या परिवर्तन बस आल्या होत्या; परंतु यात झपाट्याने बदल करत आरामदायी शिवशाही आल्या आणि त्या पाठोपाठ साधी लालपरी म्हणून नव्या बांधणीतील स्टील बॉडीची पांढऱ्या रंगातील बस तयार करण्यात आल्या. या एम.एस. बॉडीच्या २५ बस जळगाव विभागात दाखल झाल्या असून, या बस भुसावळ- धुळे, चोपडा- जळगाव, धरणगाव, शिरपूर- पाचोरा, रावेर- जळगाव, अमळनेर- धुळे या मार्गावर जलद म्हणून धावत आहेत.

सर्व बसना फलक अनिवार्य
स्थानकातून बस मार्गस्थ करताना चालकांकडून काचेवरच चुन्याने गावाचे नाव टाकले जात असायचे. यामुळे प्रवाशांना नाव वाचता येत नव्हते, तर काही चालक लाल रंगाच्या अक्षरातील पाटी लावून थांब्यावर बस न थांबविताच नेत होते. यासाठी विभागात २५०० नवीन प्लॅस्टिकचे बोर्ड तयार करण्यात आले असून, ते लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय, बस सर्व थांब्यांवर थांबविण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT