Muthoot-Finance
Muthoot-Finance 
उत्तर महाराष्ट्र

सॅम्युअलचा दुसरा मारेकरीही गजाआड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - गेल्या महिन्यात येथील मुथुट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावरील दरोडा प्रकरणात तिसरा संशयित कुख्यात आकाशसिंग विजयबहादूरसिंग राजपूत (वय 30, रा. रामपूर, ता. मच्छली, उत्तर प्रदेश) यास बिहारमधील आरा शहरातून अटक करण्यात आली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेला अभियंता सॅजू सॅम्युअलवर आकाशसिंग यानेच पाच गोळ्या झाडल्याची कबुली दिली असून, जिल्हा न्यायालयाने त्यास 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या दरोड्याचा मुख्य सूत्रधार कुख्यात दरोडेखोर सुबोधसिंग असल्याचे तपासातून निष्पन्न झाले असून, या टोळीविरोधात नाशिक पोलिसांकडून मोक्काअन्वये कारवाई केली जाणार आहे.

मुथुट फायनान्स दरोडाप्रकरणी यापूर्वी पोलिसांनी जितेंद्रसिंग राजपूत, परमेंदरसिंग या दोघांना अटक केली आहे, तर आकाशसिंग हा तिसरा संशयित अटक झाला आहे. आकाशसिंग बिहारमध्ये असल्याची माहिती मिळताच नाशिक गुन्हे शाखा युनिट दोन व अंबड पोलिस अशी दोन पथके 16 दिवसांपूर्वी रवाना झाली होती. पाटना, दानापूर, राजीवनगर, रुपसपूर येथे त्याचा शोध घेतला; परंतु तो ठिकाणे बदलत असल्याने आरा शहरात गेल्याचे समजल्यावर पोलिस त्याच्या मागावर गेले.

बिहारी वेशभूषा करून पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता, आरा शहरात असल्याचे निश्‍चित झाले. सतत तीन-चार दिवस सापळा रचल्यानंतर विष्णूनगरमधील त्याच्या स्विफ्ट कारकडे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यास शिताफीने अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT