Nashik-District-Bank
Nashik-District-Bank 
उत्तर महाराष्ट्र

३४७ कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी ३८ संचालक चौकशीच्या फेऱ्यात

सकाळवृत्तसेवा

नाशिक - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३४७ कोटी कर्जवाटपाचे प्रकरण संचालकांच्या अंगाशी आले आहे. या थकबाकीसाठी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सहकार विभागाने सुनावणी सुरू केली असून, त्यात आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. 

सहकार विभागाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर जिल्हा बॅंकेने १२ संस्था व ३८ संचालकांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. जिल्हा बॅंकेकडे २००२ ते २०१३ या कलावधीत निफाड व नाशिक सहकारी साखर कारखाना, आर्मस्ट्राँग, मालेगावची रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था, श्रीराम सहकारी बॅंक, दिंडोरी तालुक्‍यातील आदिवासी विकास कार्यकारी सोसायटी, सिन्नर तालुका बहुउद्देशीय सहकारी संस्था, मालेगावमधील विविध कार्यकारी सोसायटी आदींकडे ३४७ कोटींच्या कर्जाची थकबाकी आहे. विविध उपाय आखूनही कर्जाची वसुली होत नसल्याने बॅंकेचा एनपीए वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर बॅंकेच्या माजी संचालकांनी चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत तत्कालिन लेखापरीक्षक जयेश आहेर यांनी झालेल्या कर्जवाटपाची चौकशी केली. 

चौकशीचा अहवाल सहकार विभागाला सादर झाला होता. त्यात मोठी थकबाकी असणाऱ्या १२ संस्थांना अनियमित कर्जवाटप झाल्याचा निष्कर्ष नोंदवून बॅंकेच्या झालेल्या नुकसानीचा ठपका ठेवला होता. अहवालाच्या आधारे बलसाने यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

गुन्हे दाखल होण्याची शक्‍यता
आजच्या प्राथमिक सुनावणीत तत्कालीन संचालकांची बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर आजी-माजी संचालक जिल्हा बॅंकेत गेले होते. थकबाकीदार १२ संस्थांकडील थकबाकी वसूल न झाल्यास जिल्हा बॅंक संचालक मंडळाने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहकार विभागाच्या नोटिसा
सहकार विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावलेल्यांची नावे अशी ः आमदार नरेंद्र दराडे, जे. पी. गावित, माजी आमदार शांतारामतात्या आहेर, माणिकराव बोरस्ते, ॲड. अनिल आहेर, प्रशांत हिरे, वसंत गिते, शिरीषकुमार कोतवाल, नानासाहेब सोनवणे, राजेंद्र भोसले, चंद्रकांत गोगड, माणिकराव शिंदे, अविनाश अरिंगळे, राजेंद्र डोखळे, चिंतामण गावित, दत्ता गायकवाड, सुचेता बच्छाव, परवेझ कोकणी, राघो आहिरे, धनंजय पाटील, गणपत पाटील, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, ॲड. संदीप गुळवे, नानासाहेब पाटील, डॉ. शोभा बच्छाव, वैशाली अनिल कदम, माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, बबनराव घोलप, प्रसाद हिरे, शोभा दळवी, मंदाकिनी कदम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT